Video: हुक्केरी शहरावर ढगफुटीने दाणादाण; वाहनांचे प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 10:31 PM2020-10-11T22:31:57+5:302020-10-11T22:34:26+5:30
रस्त्याच्याकडे असलेल्या असलेली वाहने, भाजी आणि फळे विकणऱ्या हातगाड्या कचरा वाहून जावा , तशा वाहत होत्या.
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी या तालुका शहराच्या परिसरात रविवारी सायंकाळी न भूतो न भविष्याती असा ढगफुटीचा पाऊस झाला आणि पन्नास हजार लोकसंख्येच्या शहरातील मुख्य रस्ता जणू नदीत रूपांतरीत झाला.
रस्त्याच्याकडे असलेल्या असलेली वाहने, भाजी आणि फळे विकणऱ्या हातगाड्या कचरा वाहून जावा , तशा वाहत होत्या. पाण्याचा जीर इतका होता की, अनेक सायकली , मोटारसायकली आणि कारगाड्या वाहत ओढ्यात जाऊन पडल्या. हातगाडी वाचविण्यासाठी धडपड करणारा एक भाजी विक्रेता गाडी अंगावर कोसळल्याने वाहत नदीला जाऊन मिळाला. त्या उशिरापर्यंत शोध चालू होता.
कोरोनामुळे आठ महिन्यांनी बरेच व्यवहार सुरू झाल्यानंतरचा पहिला रविवार असल्याने खरेदीसाठी हुक्केरी परिसरातील ग्रामस्थांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सकाळपासूनच हवेत उष्मा होता आणि सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काळे ढग जमून आले आतासभराच्या पावसाने हुक्केरी शहरात नदी वाहावी असे मुख्य रस्त्यावरून पाण्याचा ओढा वाहू लागला. कोणतीही आत्पकाळीन व्यवस्था सज्ज नसल्याने आणि काही कळण्या अगोदर मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले.
हुक्केरी शहरावर ढगफुटीने दाणादाण; प्रचंड नुकसान pic.twitter.com/B5tcqi00eb
— Lokmat (@MiLOKMAT) October 11, 2020