दरवर्षी यात्रेपूर्वी ही शिखरे रंगविली जातात. कारण येथील पावसाळी हवामान खराब असते. सतत पावसाची रिपरिप दाट धुके यांचा सामना या शिखरांना करावा लागतो. परिणामी पावसाचे पाणी शिखरातून आत मंदिरांमध्ये येते. त्यामुळे दरवर्षी चैत्र यात्रेपूर्वी या शिखरांची रंगरंगोटी केली जाते.
दरवर्षी ही सर्व शिखरे स्वच्छ करून त्यावर रंगरंगोटी करण्याची पारंपरिक पद्धत डोंगरावर आजतागायत सुरू आहे. गेल्या वर्षी मात्र यामध्ये खंड पडला. श्री महादेव श्री चोपडाईदेवी व श्री जोतिबा देव अशा या तीन मंदिरांचा समूह असून, या तिन्ही मंदिरांची शिखरे उंच असून, शिखरावर चढ-उतार करण्याचे काम अवघड आहे. वरती चढताना दोर लावूनच या शिखरांवर चढावे लागते. मोठ्या दोराच्या साह्यानेच ही शिखरे रंगवावी लागतात. पूर्ण काळजीपूर्वक हे काम करावे लागते. उन्हामुळे मंदिरावरील दगड तापतो परिणामी पायाला चटके बसतात. त्यामुळे रंगरंगोटी ही सकाळी लवकर व दुपारनंतर करावी लागते .
दरम्यान, ही शिखरे दरवर्षी स्वच्छ केल्यामुळे त्यास ऑइल पेंट कलर केल्यामुळे त्यास वर्षभर काही होत नाही. रंगरंगोटी केलेली शिखरे ही आकर्षक दिसतात. त्यामुळे मंदिराला शोभा येते. असे रंगकाम करणारे कामगार सांगत होते.
चौकट : जोतिबा डोंगरावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाचे प्रमाण जास्त असते. एप्रिल महिन्यात दिलेला शिखराचा रंग पावसामुळे उडून जातो. वर्षभर रंग टिकून राहत नाही. त्याऐवजी ऑक्टोंबर महिन्यात नवरात्रौत्सवाच्या अगोदर रंगरगोटी केल्यास तो जास्त काळ टिकून राहील. नवरात्रौत्सवापूर्वी ही रंगरंगोटी करावी आशा प्रतिक्रिया नागरिकांतून दिल्या जात आहेत.
फोटो कॅप्सन २६ एप्रिलला जोतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा मंदिराच्या शिखरांचे रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.