आ. दिवाकर रावतेंकडून ‘सीपीआर’ला रुग्णवाहिका भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:31+5:302021-05-25T04:27:31+5:30
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी येथील सीपीआर रुग्णालयासाठी रुग्णवाहिका घेण्याकरिता १७ लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून उपलब्ध ...
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी येथील सीपीआर रुग्णालयासाठी रुग्णवाहिका घेण्याकरिता १७ लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून उपलब्ध करुन दिला. जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी यासंबंधीचे पत्र सीपीआर प्रशासनाकडे सुपूर्द केले.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर (सीपीआर) येथे एक रुग्णवाहिका आपल्या आमदार निधीतून मिळावी अशी विनंती जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दि. १४ मे रोजी शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांच्याकडे केली होती, त्या संदर्भातील पत्र सुद्धा अधिष्ठाता डाॅ. एस. एस. मोरे यांनी दिले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रयत्नाने आ. रावते यांनी पत्राची तत्काळ दखल घेऊन
आपल्या आमदार निधीतून १७ लाख रुपये मंजूर केले. तशा आशयाचे पत्र त्यांनी दिले. हेच पत्र सोमवारी संजय पवार यांनी सीपीआर प्रशासनाकडे सुपूर्द केले. यावेळी राजू सांगावकर, अवधूत साळोखे, मंजित माने,राजेंद्र पाटील,हर्षल सुर्वे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-दिवाकर रावते
ओळ - शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी सीपीआर रुग्णालयास एक रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता १७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे पत्र जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सीपीआर प्रशासनाकडे सुपूर्द केले.