सर्वसामान्य माणसांची सावकारी पाशातून मुक्तता व्हावी, त्यांना विनाविलंब कर्ज पुरवठा व्हावा, तसेच सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवीचे संरक्षण व्हावे, यासाठीच कर्मवीर संस्था कार्यरत आहे. संस्थेचे आर्थिक जाळे मजबूत व्हावे म्हणून शाखा शुभारंभ करण्यात आला. संस्थेने ७८० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचे अध्यक्ष भोकरे यांनी सांगितले. याप्रसंगी डी. डी. लडगे, प्रा. डी. ए. पाटील, वि. दा. आवटी, अमोल हुक्किरे, सुभाष देसाई, राजू मालगावे, ए. ए. पाटील, शिवाजी केर्लेकर, शिरीष पाटील, प्रवीण वाकसे, सुप्रिया पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. स्वागत रवींद्र पाटील तर प्रास्ताविक भूपाल गिरमल यांनी केले. राजेंद्र नांदणे यांनी आभार मानले.
फोटो - ०३०९२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - पेठवडगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेचा प्रारंभ अध्यक्ष अनिल भोकरे यांच्या हस्ते झाले.