शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुश्रीफ-घाटगे यांच्यातच झुंज

By admin | Published: October 02, 2014 12:34 AM

कागलला नऊ उमेदवार रिंगणात : परशुराम तावरे कोणाची मते खाणार?

जहॉँगीर शेख -कागल -- विधानसभा मतदारसंघात यावेळी नवरंगी निवडणूक होत असून, अर्धा डझन अधिकृत पक्षांचे उमेदवार पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय घाटगे या दोन उमेदवारांमध्येच प्रमुख लढत असली, तरी भाजपचा मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे किती मते घेतात आणि ती कोणाला मारक ठरतात, याची उत्सुकताच आहे. हसन मुश्रीफ-संजय घाटगे यांची लढत होणार हे लोकसभा निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेआधी दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप होऊन आघाडी, युतीमध्ये घटस्फोट झाले. पक्षापेक्षा गटाच्याच राजकारणाला महत्त्व देणाऱ्या या मतदारसंघात युती तुटली, आघाडी फुटली याचे मोठे परिणाम होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, हसन मुश्रीफ आणि संजय घाटगेंना इतर पक्षांचे उमेदवार कोण असावेत याची मात्र काळजी होती. राष्ट्रीय कॉँग्रेसचे संतान बारदेस्कर (गडहिंग्लज) हे या काळजीवाहू राजकारणाचेच संदर्भ आहेत. कारण जि. प.चे माजी अध्यक्ष मनोज आपटे, राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव कुऱ्हाडे असे दिग्गज उमेदवार असताना पक्षाने उमेदवारी बारदेस्कर यांना दिली आहे, तर संजय घाटगे गटातून राष्ट्रीय कॉँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झालेले परशुराम तावरे हे देखील राष्ट्रीय कॉँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बाबा देसार्इंचा हात पकडून थेट भाजपचेच दार ठोठावले आणि तिकीटही आणले. भाजपच्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर. पी. आय. (आठवले गट), रासप या मित्रपक्षांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी संजय घाटगे हे शेतकरी संघटनेचे उमेदवार होते. परशुराम तावरे यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. आता ही महायुती तिसरा पर्याय या मतदारसंघात ठरणार की, कोणाच्या तरी पराभवाचे कारण ठरणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण या पक्षांची लहान-लहान असेनात, पण मतांची पाकिटे मतदारसंघात आहेत. कै. बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू बाळासाहेब कुपेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. कारण कुपेकर घराण्यातील उमेदवारीचा फटका मुश्रीफांना बसणार होता. त्यांच्या माघारीने हा धोका तूर्त तरी टळला आहे. बाकी बसपा, ‘मनसे’चे अनुक्रमे सुदाम कांबळे, अजित मोडेकर यांच्यासह तीन अपक्ष काही मतांचे मानकरी असले, तरी ती मतेही एखाद्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवू शकतात. या बेरजेच्या आणि वजाबाकीच्या राजकारणामुळेच इतर उमेदवारांना महत्त्व आले आहे. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात घेतलेल्या काही निर्णयांचे पडसाद या मतदारसंघात उमटले. बाळासाहेब कुपेकर यांचा उमेदवारी अर्ज यातून भरला गेला, तर कॉँग्रेसचा उमेदवारही फारसा चर्चेतील निवडला गेला नाही. एकूणच राष्ट्रवादी-शिवसेना उमेदवारांत येथे प्रमुख लढत असली, तरी जिल्ह्याच्या राजकारणाचेच संदर्भ महत्त्वाचे मानल्याचे स्पष्ट झाले. कागल एकूण मतदार ३,0१,१४५ नावपक्षहसन मुश्रीफ राष्ट्रवादीसंजय घाटगे शिवसेनापरशुराम तावरेभाजपसंतान बारदेस्करकाँग्रेसअजित मोडेकरमनसेसुदाम कांबळे बसपाअमर शिंदेअपक्षदयानंद कांबळेअपक्षश्रीपती कांबळे अपक्ष