सडोली खालसा उपरुग्णालयात लसीकरणावेळी गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:27+5:302021-07-02T04:16:27+5:30
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे उपक्रेंद्र ग्रामीण रुग्णालयात लसीकरणावेळी गोंधळ झाला. रुग्णालयातील लसीकरण करणाऱ्या महिलेला मारहाण करुन ...
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे उपक्रेंद्र ग्रामीण रुग्णालयात लसीकरणावेळी गोंधळ झाला. रुग्णालयातील लसीकरण करणाऱ्या महिलेला मारहाण करुन तिचे मंगळसूत्र तोडल्याप्रकरणी बाबुराव उर्फ जगन्नाथ शंकर पाटील (रा. सडोली खालसा) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सडोली खालसा येथील कोविड सेंटरवर मनिषा रघुनाथ मोरे (वय ३६, रा. सडोली खालसा) या कोविड रुग़्णांची ‘आरटीपीसीआर’ची तपासणी करतात. बुधवारी गावातील बाबुराव पाटील याने लसीकरणावरुन ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घातला. सध्या ६० वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम सुरु असताना, तुम्ही कमी वयाच्या लोकांना लसीकरण का करता, त्यामुळे लसीकरणाचे नियोजन बिघडल्याचा आरोप करत त्याने मोरे यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. याप्रकरणी मोरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, बाबुराव पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.