शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

अडीच कोटी शौचालयांचे बांधकाम केवळ कागदावर!

By admin | Published: December 09, 2015 11:17 PM

आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) सरकारच्या काळात विविध केंद्रीय योजनांखाली देशाच्या ग्रामीण भागांत अडीच कोटींहून अधिक स्वच्छतागृहांचे बांधकाम केवळ कागदावरच केले

आजरा : प्रकल्पग्रस्त म्हणजे काय? धरणग्रस्तांच्या व्यथा काय? पुनर्वसनाचा प्रश्न कसा सुटू शकतो? याची काडीचीही माहिती नसणारी, तसेच ‘उचंगी’ लाभक्षेत्रासह धरणातला ‘ध’सुद्धा ज्यांना माहीत नाही, अशी मंडळी ‘उचंगी’बाबत बोलू लागली आहेत. धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत खोटे चित्र शासनाकडून उभे केले जात असून, ‘पर्यायी जमिनी द्या, मगच पाणी अडवा’ याच्याशी आपण ठाम असून, जोपर्यंत उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शंभर टक्के होत नाही. तोपर्यंत उचंगीत पाण्याचा थेंब अडवू देणार नाही, असा खणखणीत इशारा श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. भारत पाटणकर यांनी दिला.चाफवडे, जेऊर, उचंगी येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली चाफवडे येथे पार पडली. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, शासनाकडे खोट्या माहितीवर आधारित जलयुक्त शिवार योजनेला देण्यासाठी पैसे आहेत; परंतु धरणाला व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याकरिता पैसे नाहीत. गेली १८ वर्षे उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. पुनर्वसनाचे तुणतुणे वाजण्यात १८ वर्षे जात असतील, तर पुढच्या विकासाचे काय? कोल्हापूर जिल्ह्याला शासनाकडून नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. धरणांना पाट नसल्याने जमीनदारांसारखी ‘पाणीदार’ ही पाणी विकणारी नवी जमात अस्तित्वात येत आहे. धरणग्रस्तांच्या नावाने खडे फोडून लाभक्षेत्रातील मंडळींना कधीच पाणी मिळणार नाही. सरकारच्या भूलथापांना प्रकल्पग्रस्त कधीच फसणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी कॉ. संपत देसाई, नारायण भडांगे यांची भाषणे झाली. बैठकीस विष्णू मांजरेकर, दादासाहेब मोकाशी, आदी उपस्थित होते. सरकारी दराने शासकीय यंत्रणेने प्रकल्पातील पाणी शासनाने उचलून द्यावे.धरण झालेच पाहिजे; परंतु त्यासाठी शासनाने प्रकल्पासह प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत.प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पैसे न देता केवळ धरणासाठी पैसे दिल्यास धरणाचे काम सुरू करू नये.मुख्यमंत्र्यांना तिळगूळ देणारयावर्षी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लागल्यास धरणावर तिळाचे पीक घेऊन पुढच्या संक्रांतीला मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून तिळगूळ देण्याचे ठरले.‘उचंगी’साठी आवश्यक जमीन उपलब्ध होणारअप्पर जिल्हाधिकारी : चाफवडे येथे बैठकआजरा : वाटंगी येथील जगद्गुरू स्वामींच्या मालकीच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ही जमीन उपलब्ध होणार असली तरीही २० हेक्टर जमीन कमी पडणार आहे. कमी पडणाऱ्या जमिनीसाठी प्रकल्पग्रस्तांनी संपादित करण्यायोग्य जमिनीचा शोध सुरू करावा, प्रशासनाचे त्याला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी दिले.उचंगीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा गतिमान झाली. ‘श्रमुद’चे डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, उपविभागीय अधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांची बैठक चाफवडेत पार पडली.डॉ. पाटणकर यांनी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होणार असल्यास त्यामध्ये पुनर्वसनाचा समावेश आहे का? असा प्रश्न उपस्थित करून प्रकल्पाबाबत शासनाची भूमिका समजावून घेतली. एकूण प्रकल्पग्रस्तांपैकी काहींना जमिनीपैकी काहीच जमीन मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी संपत देसाई यांनीही काही सूचना केल्या.