मुसळधार पावसातही पडळ सबस्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे वीजजोडणीकामी योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:25 AM2021-05-18T04:25:12+5:302021-05-18T04:25:12+5:30

यवलूज - यवलूज ( ता. पन्हाळा ) परिसरात दोन दिवस झालेल्या वादळ वाऱ्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्यामुळे ...

Contribution of Padal substation staff for power supply even in torrential rains | मुसळधार पावसातही पडळ सबस्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे वीजजोडणीकामी योगदान

मुसळधार पावसातही पडळ सबस्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे वीजजोडणीकामी योगदान

Next

यवलूज - यवलूज ( ता. पन्हाळा ) परिसरात दोन दिवस झालेल्या वादळ वाऱ्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्यामुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

या भागाला गेली दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधाव पावसाने झोडपून काढले होते. अशातच अनेक भागात मोठे -मोठे वृक्ष व त्यांच्या फांद्या लाईटच्या वीजवाहक तारांवरती पडल्याने रविवारी दुपारपासून यवलूज परिसरात वीज बंद होती. सायंकाळी वीज सुरू करण्याकामी पडळ सब स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु मुसळधार पावसात वीजजोडणीचे काम करताना त्यांना बऱ्याच मर्यादा आल्याने त्यांनी पुन्हा सोमवारी सकाळीच आपली मोहीम याकामी मार्गी लावून काही वेळातच या परिसरातील लाईट सुरू केल्याने पडळ महावितरण टिमच सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. यामध्ये रणजित मोरे, अनिकेत पाटील, प्रज्वल पाटील, गोपी पाटील, धनवान सुलताने, धीरज काशिद यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ- यवलूज परिसरात भरपावसात वीजजोडणीसाठी शर्थिचे प्रयत्न करताना पडळ सबस्टेशनचे कर्मचारी.

Web Title: Contribution of Padal substation staff for power supply even in torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.