राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण : सुधाकर मणेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:03+5:302021-09-07T04:29:03+5:30
कबनूर : राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सुधाकर मणेरे ...
कबनूर : राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सुधाकर मणेरे यांनी केले.
येथील डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यावतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सुभाष केटकाळे व संजय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका तस्लीम मणेर यांनी स्वागत केले. या वेळी उपमुख्याध्यापिका संगीता व्हनबट्टे, पुष्पा ऐनापुरे, स्वाती ढेकळे, आदी उपस्थित होते. सुधा शिलेदार यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नाली मसुटगे यांनी आभार मानले. कबनूर हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये एस. जी. उगारे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. पाटील होते. संजय चौगुले यांनी स्वागत केले. एस. जी. उगारे यांचे भाषण झाले. प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका एस. एस. नोरजे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. जी. जी. लंबे यांनी आभार मानले.