corona in belgaon : बेळगावात आणखी दोघे रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 04:28 PM2020-04-21T16:28:25+5:302020-04-21T16:30:32+5:30
बेळगावात दोन कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्या दोघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.या दोन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यापैकी एक रुग्ण रायबाग कुडची येथील तर दुसरा रुग्ण हिरेबागेवाडी येथील आहे.
बेळगाव : बेळगावात दोन कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्या दोघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.या दोन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यापैकी एक रुग्ण रायबाग कुडची येथील तर दुसरा रुग्ण हिरेबागेवाडी येथील आहे.
हिरेबागेवाडी येथील 20 वर्षीय युवक(पी-128) दिल्ली मरकजला जाऊन आल्यावर त्याला कोरोनाची बाधा झाली होती या शिवाय कुडची येथील 40 वर्षीय इसमाला (पी-148) देखील दिल्लीला जाऊन आल्यावर लागण झाली होती आता दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत.
हिरेबागेवाडीचा युवक 1 एप्रिल रोजी तर रायबाग कुडची इसम 2 एप्रिल रोजी क्वांरंटाइन झाले होते अनुक्रमे 3 व 4 एप्रिल रोजी पोजिटिव्ह झाले होते 21 एप्रिल रोजी ते निगेटिव्ह झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 42 रुग्णांपैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा देखील आकडा वाढत आहे.
कर्नाटक राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये काल सायंकाळपासून आणखी सात जणांची भर पडल्यामुळे राज्यातील करुणा बाधित यांची एकूण संख्या 415 झाली आहे. यापैकी 114 जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काल सोमवारी 408 वर पोचली होती. त्यामध्ये सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 21 एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत नव्याने 7 रुग्णांची भर पडली आहे. या सात रुग्णांमध्ये विजयपुरा आणि कलबुर्गी येथील प्रत्येकी तिघा जणांसह मंगळूर येथील एकाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या सातपैकी चार महिला आहेत. विजयपुरा येथील दोन महिला (वय 18 व 30) आणि एक युवक(18) पी - 306 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना बाधित झाले आहेत. राज्यातील 415 कोरोना बाधित रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 114 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात रोज रुग्ण सापडत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि शनिवारी एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे आणि गेले सलग तीन दिवस नव्याने एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात केवळ 17 दिवसात 42 जणांना कोरोना विषाणुची बाधा झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना राबवून सीलडाऊन केले आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 42 रुग्णांची तब्येत चांगली आहे.
त्यापैकी कांही जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या तपासण्या आणि खबरदारी घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.