जिल्ह्यात कोरोनाचा महाविस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:39+5:302021-05-06T04:26:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊन कडक केल्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा महाविस्फोट झाला. दुसऱ्या लाटेत आजवरचे सर्वाधिक ...

Corona eruption in the district | जिल्ह्यात कोरोनाचा महाविस्फोट

जिल्ह्यात कोरोनाचा महाविस्फोट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लॉकडाऊन कडक केल्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा महाविस्फोट झाला. दुसऱ्या लाटेत आजवरचे सर्वाधिक १५५३ रुग्ण आढळले असून ५३ जणांचा बळीही गेला आहे. त्यातील ६ इतर जिल्ह्यांतील तर ४७ मृत्यू जिल्ह्यातील आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्याही १० हजार २७४ वर गेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून सलग दुसऱ्या दिवशी मृत्युसंख्येत वेगाने वाढ झाली आहे. मंगळवारी ४४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात बुधवारी आणखी ९ जणांची भर पडल्याने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचे स्पष्ट होत आहे. एकाच दिवशी ५० च्यावर मृत्यू आणि दीड हजारांवर रुग्ण सापडणे हे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आणखी गडद होत चालली आहे. दिवसभरात १०१८ जण डिस्चार्ज झाले आहेत हाच काय तो दिलासा मिळाला आहे.

शिरोळ तालुक्यात तब्बल ३०८ रुग्ण

कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३६० इतके सर्वाधिक रुग्ण सापडले असताना एकट्या शिरोळ तालुक्यात ३०८ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. हा आजवरचा उच्चांक आहे.

बुधवारी ५ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात वाढलेले १५५३ नव्या रुग्णांपैकी १४० रुग्ण परजिल्ह्यांतील आहेत तर १४१३ रुग्ण एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यातही कोल्हापूर महापालिकेचे ३६०, इचलकरंजी नगरपालिका १५६, जयसिंगपूर नगरपालिका २७ असे एकूण १८७ रुग्ण आढळले आहेत.

चौकट

‘गोकुळ’ची निवडणूक आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने ही निवडणूक या विस्फोटाला कारणीभूत असल्याची चर्चा सुरू झाली आहे; शिवाय खरेदीसाठीही लोक मोठ्या प्रमाणात दुकानात गर्दी करत असून ११ पर्यंतच्या वेळेच्या बंधनाचाही पुनर्विचार करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात या ठिकाणी झाले कोरोनाचे मृत्यू

कोल्हापूर शहर (१२) : आर. के. नगर, लाईन बाजार, नाना पाटील नगर, राजेंद्रनगर, वारे वसाहत, जाधवनगर, कसबा बावडा, जरगनगर, मंगळवार पेठ, सुभाषनगर, आपटेनगर, देवणे गल्ली

करवीर (०७) : पाचगाव, सोनतळी, शिरोली दुमाला, उचगाव, निगवे दुमाला, वळिवडे, पाडळी

शिरोळ (०४) हेरवाड, दानोळी, आलास, रेणुकानगर

इचलकरंजी (०६) नेहरूनगर, अवधूत नगर, नदीवेस, प्रियदर्शिनी कॉलनी, देवराली मळा, जिवेश्वर मंदिर,

हातकणंगले (०८) तळसंदे, शाहू कॉर्नर, साजणी, माणगाव, सिद्धार्थनगर कोरोची, चंदूर, तारदाळ, पेठवडगाव

भुदरगड : म्हसवे, दोनवडे

कागल : कापशी माद्द्याळ, कसबा सांगाव

कोरोना अपडेटट

५ मे २०२१ ची आकडेवारी

आजचे रुग्ण : १५५३

आजचे जिल्ह्यातील मृत्यू: ४७

इतर जिल्ह्यातील मृत्यू: ०६

उपचार घेत असलेले: १० हजार २७४

आजचे डिस्चार्ज: १०१८

सर्वाधिक रुग्ण:

कोल्हापूर शहर: ३६०

शिरोळ: ३०८

करवीर १६१

इचलकरंजी १५६

हातकणंगले: ९४

कोल्हापूर शहर मृत्यू: १२

आर के नगर १

लाईन बाजार १

मंगळवार पेठ २

नाना पाटील नगर १

राजेंद्रनगर १

वारे वसाहत १

जाधवनगर १

कसबा बावडा १

जरगनगर १

सुभाष नगर 01

आपटेनगर १

देवणे गल्ली १

तालुकानिहाय मृत्यू रुग्ण

करवीर ०७ १६१

हातकणंगले ०८ ९४

भुदरगड २ ६१

पन्हाळा ०० ७६

शिरोळ ०४ ३०८

आजरा १ १६

शाहूवाडी ० २३

गडहिंग्लज ० १८

चंदगड ० २४

राधानगरी ० २०

कागल २ ६४

गगनबावडा ० १

इचलकरंजी ६ १५६

दिवसभरातील लसीकरण : १६ हजार १२५

पहिला डोस घेतलेले नागरिक : ५ हजार २०४

दुसरा डोस घेतलेले नागरिक : १० हजार ९२१

Web Title: Corona eruption in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.