जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला लाखाचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:28+5:302021-05-26T04:26:28+5:30

गेल्यावर्षीच्या मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाची लागण सुरू झाली. सुरुवातीला कमी संख्येने रुग्ण आढळत होते. मात्र, जुलैनंतर रुग्ण वाढू लागले आणि ...

Corona victims in the district crossed the lakh mark | जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला लाखाचा टप्पा

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला लाखाचा टप्पा

Next

गेल्यावर्षीच्या मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाची लागण सुरू झाली. सुरुवातीला कमी संख्येने रुग्ण आढळत होते. मात्र, जुलैनंतर रुग्ण वाढू लागले आणि सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीने टोक गाठले. ऑक्टोबरनंतर पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आलेख खाली आला. प्रशासन, आरोग्य विभाग आणि नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला असताना आाणि जरा कुठे जनजीवन पूर्ववत होत असताना पुन्हा जानेवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली.

चौकट

नवे १४९७ रुग्ण, ५७ मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १४९७ रुग्ण आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ३७९ रुग्ण नोंदवण्यात आले असून त्या खालोखाल करवीर तालुक्यात १९८ तर हातकणंगले तालुक्यात १७५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक १४ मृत्यू झाले असून कोल्हापूर शहरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर हातकणंगले तालुक्यातील सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुकावर मृतांची संख्या

कोल्हापूर १२

लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, साबळेवाडी, ताराबाई पार्क २, टिंबर मार्केट, सणगर गल्ली, राजारामपुरी, क्रशर चौक, विचारेमाळ, महालक्ष्मी कॉलनी, शिवाजी पेठ

करवीर १४

वसगडे, गडमुडशिंगी, शिरोली दुमाला, खुपिरे, कणेरी फाटा, आरे, निगवे दुमाला, उचगाव २, हळदी, उजळाईवाडी, कंदलगाव, हसूर दुमाला, हिरवडे

हातकणंगले ०७

हुपरी २, हेर्ले, पुलाची शिरोली २, कोरोची २

पन्हाळा ०३

निवडे, मनुते, काखे

कागल ०३

करनूर, हणबर गल्ली कागल, बेलवले बु.

शिरोळ ०३

हेरवाड, जयसिंगपूर, उमळवाड

इचलकरंजी ०२

गावभाग, शहापूर

गगनबावडा ०१

साळवण

भुदरगड ०१

खेडगे

राधानगरी ०१

बनाचीवाडी

राधानगरी०१

पाटबुद्रुक

शाहूवाडी ०१

गडहिंग्लज ०१

इतर ०७

हिरेकोडी, कोगनोळी, रत्नागिरी, देवगड, निपाणी, बाळेकुंद्री, बेडकीहाळ

Web Title: Corona victims in the district crossed the lakh mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.