corona virus : शहरासाठी अच्छे दिन, अखेर कोरोनाच्या उद्रेकाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:27 PM2020-10-03T15:27:27+5:302020-10-03T15:28:27+5:30
तब्बल तीन महिन्यांनंतर शहरासाठी अच्छे दिन आले. कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी केवळ २१ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १२ हजार ६१४ इतके कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर : तब्बल तीन महिन्यांनंतर शहरासाठी अच्छे दिन आले. कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी केवळ २१ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १२ हजार ६१४ इतके कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात जुलै ते सप्टेंबरदरम्यान कोरोनाचा कहर झाला. रोज २५० पेक्षा जास्त नवीन रुग्णात भर पडत होती. दहा ते पंधरा जणांचा मृत्यू होत होता, अशा या महामारीची धास्ती सर्वांनी घेतली. सरकारी खासगी रुग्णालय तुडुंब झाली.
बेड मिळत नसल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. गेल्या आठ दिवसांत मात्र दिलासादायक चित्र आहे. दिवसात १०० पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सध्या तरी साथ आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी दिवसभरात शिवाजी पेठ ५, सदर बाजार ४,नागाळा पार्क २,बोंद्रेनगर, दसरा चौक, दुधाळी, माळी कॉलनी, मार्केट यार्ड, राजोपाध्येनगर, रायगड कॉलनी, रुईकर कॉलनी, शिवाजी चौक, उद्यमनगर या परिसरांत प्रत्येकी एक रुग्ण नव्याने आढळून आला.