फेजिवडे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:08+5:302020-12-22T04:24:08+5:30
: स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, आशा, ग्रामपंचायत, अंगणवाडी, महसूल व अन्य कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे कोरोनाची ...
: स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, आशा, ग्रामपंचायत, अंगणवाडी, महसूल व अन्य कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्यात यश आले. याचे श्रेय सर्व संबंधितांना जाते, असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी केले. फेजिवडे (ता. राधांनगरी) येथे आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच फारूख नावळेकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. राजेंद्र शेटे यांच्यासह ग्रामसेवक युवराज कांबळे, आरोग्यसेवक पाटील, सेविका सारिका बावडेकर, लता चव्हाण, आशा सेविका रेणुका कांबळे, रेश्मा कांबळे, वंदना कासार, अंगणवाडी सेविका पद्मजा कुलकर्णी, सुनंदा गुरव, प्रमिला कातकर, शिला भोसले, फरिदा नावळेकर, अनुसया कांबळे, सदाशिव गुरव, डॉ. विश्वास डोंगळे, समीर गिजवणे, पत्रकार मोहन नेवडे, संजय पारकर, शशिकांत बैलकर आदींचा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.