कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महसुल वसुलीला कोरोनाचा फटका बसला आहे. वार्षिक महसूलीमध्ये तब्बल ३२ टक्के घट झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे ही घट आली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या विविध करापोटी ३०१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. वार्षिक ४३९ कोटी रुपयांचे लक्ष्य असताना कोरोनामुळे अवघे ३०१ कोटी रुपयेच महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. महानगरपालिकेला मालमत्ता करापोटी सर्वाधिक तर पाणीपट्टीतून पन्नास टक्के वसुली झाली आहे. ही घट कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झाल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी सांगितले.गेल्या काही दिवसात मालमत्ता करात सवलत दिल्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाली. तुलनेने इतर करापोटी जमा झालेली रक्कम नगण्य आहे. कोविड १९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अनेक बिल्डिंग कंत्राटदारांकडून बांधकाम शुल्क जमा करण्यात टाळाटाळ झाली. नवे इमारत प्रकल्प सुरु न झाल्याचाही फटका महापालिकेला बसला आहे. येत्य वर्षात अनेक नवीन इमारत प्रकल्प सुरु होत असल्यामुळे यातून मिळणारा महसूलही वाढेल अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा महापालिका वसुलीला फटका, वार्षिक महसूलीत ३२ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 7:51 PM
Muncipal Corporation kolhapur- कोल्हापूर महानगरपालिकेच्या महसुल वसुलीला कोरोनाचा फटका बसला आहे. वार्षिक महसूलीमध्ये तब्बल ३२ टक्के घट झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे ही घट आली आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा महापालिका वसुलीला फटकावार्षिक महसूलीत ३२ टक्के घट