लसीकरण केल्यानंतर पुढील साठ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्ह्यातील अठरा वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करण्याच्या अगोदर रक्तदान करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. आतापर्यंत ८२ हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. १ मेपासून अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून लसीकरण करता यावे यासाठी महानगरपालिकेने ई- टोकन प्रणाली सुरू करावी. बैठकीला उपायुक्त निखिल मोरे, रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने आदी उपस्थित होते.
फोटो : २४०४२०२१-कोल-ऋतुराज पाटील