आत्महत्येपासून परावृत्त करण्यात राज्यातील समुपदेशक यशस्वी, ‘टोल फ्री’वर सर्वाधिक समुपदेशन कोल्हापुरातून 

By संदीप आडनाईक | Published: September 25, 2024 04:49 PM2024-09-25T16:49:51+5:302024-09-25T16:50:12+5:30

मानसिक तणावावर सकारात्मक उपाय

Counselors in the state are successful in preventing suicide Most counseling on Toll Free is from Kolhapur | आत्महत्येपासून परावृत्त करण्यात राज्यातील समुपदेशक यशस्वी, ‘टोल फ्री’वर सर्वाधिक समुपदेशन कोल्हापुरातून 

आत्महत्येपासून परावृत्त करण्यात राज्यातील समुपदेशक यशस्वी, ‘टोल फ्री’वर सर्वाधिक समुपदेशन कोल्हापुरातून 

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : असंख्य कारणांमुळे मानसिक तणावाखाली असणारे टेली मानसचा टोल फ्री क्रमांक फिरवितात. आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक म्हणजे ६१११ फोन कॉल्सवर कोल्हापूर केंद्राने समुपदेशन केले आहे. कौतुकाची बाब म्हणजे या सर्व कॉल्सला योग्य उत्तरे देऊन त्या व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे श्रेय त्या त्या जिल्ह्यातील समुपदेशकांनी मिळवलेले आहे. २४ सप्टेंबर रोजी ऑगस्ट अखेर घेतलेल्या आढावा बैठकीत हा सकारात्मक उपाय यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.

कर्ज, ताणतणाव, परीक्षेत अपयश, व्यसन, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त असलेले लोक या १४४१६ टेली मानस टोल फ्री नंबरवर फोन करतात.

त्यांचे समुपदेशन करण्यात पहिल्या पाच क्रमांकात कोल्हापूर आघाडीवर आहे. पुणे, सांगली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा त्यापाठोपाठ समावेश आहे. रायगड, मुंबई उपनगर, नंदुरबार, पालघर आणि यवतमाळ हे जिल्हे सर्वात शेवटी आहेत.

टेली मानसवर समुपदेशन

कोल्हापूर : ६१११, पुणे : ४९२३, सांगली : ४६३९, मुंबई : ३६५२, छत्रपती संभाजीनगर : २६८०, बीड :२३३६, नाशिक : १८०३, धाराशिव : १७७७, नागपूर : १७२३, जळगाव : १४१३, सातारा : १३४५, जालना : १२९३, अहमदनगर : १२५६, अकोला : १२३०, बुलढाणा : १०६४, ठाणे : १०१६, वाशिम : १००१, चंद्रपूर : ९७५, रत्नागिरी : ९५६, नांदेड : ९१५, अमरावती : ८४०, लातूर : ८१८, हिंगोली : ७६३, धुळे : ७४०, सोलापूर : ७३०, सिंधुदुर्ग : ६००, गोंदिया : ५७४, वर्धा : ५६८, परभणी ५६२, गडचिरोली : ५४१, यवतमाळ ५३८, पालघर : ५१७, नंदुरबार : ५०८, मुंबई उपनगर : ३९९, रायगड : ३८९

केंद्र सरकारने १९८२ मध्ये टेली मानस केंद्राद्वारे समुपदेशनाचा हा कार्यक्रम सुरु केला. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धडपडणाऱ्या समुपदेशकांची सकारात्मक बाजू यामुळे पुढे आली आहे. -डॉ. अर्पणा कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सेवा रुग्णालय.

Web Title: Counselors in the state are successful in preventing suicide Most counseling on Toll Free is from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.