गडहिंग्लज : खवल्या मांजराची तस्करी आणि वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी अनोळखी चौघांसह आठजणांविरुद्ध गुन्हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक भरमा फडके (उंबरवाडी,ता.गडहिंग्लज ),प्रमोद पताडे (किणे,ता. आजरा), अमर नारायण कानडे (सिरसंगी ता. आजरा) आनंदा राजगिरे (लिंगनूर ता.कागल) यासंशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव नजीकच्या उंबरवाडी फाट्यावर खवल्या मांजराच्या विक्रीचा व्यवहार सुरु असताना संशयितांनी केलेल्या हल्ल्यात मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे ( रा.कराड,जि.सातारा )हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी सापळयात अडकल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले खवले मांजर पुन्हा काढून घेण्यासाठी संशयितांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यासाठी त्यांनी गडहिंग्लजपर्यंत वनकर्मचाऱ्यांचा पाठलागही केला.आजऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमरजित पवार यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
खवल्या मांजर तस्करी : वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:54 PM
Wildlife Crime ForestDepartment Kolhpur : खवल्या मांजराची तस्करी आणि वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी अनोळखी चौघांसह आठजणांविरुद्ध गुन्हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक भरमा फडके (उंबरवाडी,ता.गडहिंग्लज ), प्रमोद पताडे (किणे,ता. आजरा), अमर नारायण कानडे (सिरसंगी ता. आजरा) आनंदा राजगिरे (लिंगनूर ता.कागल) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देवन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा खवल्या मांजर तस्करी : चौघे गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात