शिंगणापूर बंधाऱ्यावर मगरीचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:45+5:302021-04-26T04:22:45+5:30
कोपार्डे : शिंगणापूर येथील बंधाऱ्यावर रविवारी रात्री ७.३० वाजेदरम्यान मगर दिसून आली. बंधाऱ्यावर ही मगर काही काळ होती. ...
कोपार्डे : शिंगणापूर येथील बंधाऱ्यावर रविवारी रात्री ७.३० वाजेदरम्यान मगर दिसून आली. बंधाऱ्यावर ही मगर काही काळ होती.
ही मगर किमान सहा ते साडेसहा फूट लांबीची असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जवळपास १५ ते २० मिनिटे ही मगर बंधाऱ्यावर ठाण मांडून होती. यानंतर ती पूर्वेकडील बाजूला असलेल्या खडकावरून नदीच्या पाण्यात गेली.
सरपंच प्रकाश रोटे यांना माहिती मिळताच त्यांनी बंधाऱ्यावर खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना घेऊन पहाणी केली. मात्र, अंधार व प्रवाही पाणी असल्याने असल्याने या मगरीबाबत अंदाज घेता आलेला नाही. सरपंच प्रकाश रोटे यांनी बंधाऱ्यावर फिरायला किंवा अंघोळीसाठी जाणाऱ्या लोकांनी सतर्कता म्हणून पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे.
२५ शिंगणापूर मगर
फोटो
शिंगणापूर बंधाऱ्यावर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता सहा ते साडेसहा फूट मगरीचे दर्शन झाले.