दत्त समूह शेतक-यांच्या पाठीशी : मल्हारपंत कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:49+5:302021-06-24T04:17:49+5:30

जुगूळ (कर्नाटक) येथील भूमी अभिरुद्धी संघाच्यावतीने ५० सभासद शेतक-यांचा १६० एकर क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प अवघ्या २५ दिवसांत पूर्णत्वास ...

Datta group with the support of farmers: Malharpant Kulkarni | दत्त समूह शेतक-यांच्या पाठीशी : मल्हारपंत कुलकर्णी

दत्त समूह शेतक-यांच्या पाठीशी : मल्हारपंत कुलकर्णी

Next

जुगूळ (कर्नाटक) येथील भूमी अभिरुद्धी संघाच्यावतीने ५० सभासद शेतक-यांचा १६० एकर क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प अवघ्या २५ दिवसांत पूर्णत्वास आला आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकायाने हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते कामाला सुरुवात झाली होती. याकामी सर्व प्रकारची आर्थिक मदत, मशिनरीची जुळणी करुन कोणतीही अडचण येऊ न देता पाटील यांनी मोठे सहकार्य केले. वीरशैव बँक तसेच शाखाधिकारी शिवमूर्ती स्वामी यांनी बँक कर्जाच्या माध्यमातून ५० लाखांची आर्थिक मदत केली. तर अभियंता कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे यांनीही वेळेत काम पूर्ण करून दिले.

यावेळी आनंद कुलकर्णी, शिवगोंडा पाटील, सुरज जमदाडे, श्रीनिवास कुलकर्णी, अण्णाप्पा जमदाडे, अण्णासाहेब रतन्नावर, विजय पाटील, अशोक पाटील, दत्तात्रय कुलकर्णी, सुधाकर गणेशवाडी, अरुण गणेशवाडी, अण्णासो पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - २३०६२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - जुगुळ (कर्नाटक) येथे क्षारपडमुक्त जमिनीच्या कामास गणपतराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

Web Title: Datta group with the support of farmers: Malharpant Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.