प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्तजयंतीनिमित्त कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात साध्या पद्धतीने श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री दत्त जन्मकाळ सोहळा दत्तभक्त व भाविकांच्याशिवाय संपन्न झाला.दत्तजयंती निमित्य आज श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे ४.०० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा,दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली. दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदा मार्फत पवमान पंचसुक्त पठन करण्यात आले. साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांचे मंदिरातून वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आली.दत्तजयंती निमित्य पालखी व दत्त मंदिर परिसर येथील दत्तदेव संस्थान, कट्टा मंडळ, पुणे येथील शेखर शिंदे व परिवार आदी यांनी आकर्षक फुले व पानांनी मंदिर परिसरात फुलांची झुंबर, माळा आदींनी सजविला होता. उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण रामचंद्र राजोपाध्ये यांचे घरी सुयोग हॉल येथे दर्शनासाठी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला होता. भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही.ची व्यवस्था होती. जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, सूचना फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी व्यवस्था करण्यात आली होती.दत्त देव संस्थानचे विश्वस्त गुंडो श्रीपाद पुजारी, विकास दिगंबर पुजारी, रामकृष्ण विष्णु पुजारी, अमोल विभूते, महेश हावळे, मेघशाम पुजारी, श्रीकांत दत्तात्रय पुजारी तसेच स्वयंसेवकांनी, प्रशासन, पोलिस यंत्रणा, व्हाईट आर्मी, वजीर रेस्कयू फोर्स तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन यात्रेचे नेटके नियोजन केले.
दत्तभक्त, भाविकांच्याशिवाय श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 5:32 PM
Datta Mandir Nurshinhwadi kolhapur- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्तजयंतीनिमित्त कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात साध्या पद्धतीने श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री दत्त जन्मकाळ सोहळा दत्तभक्त व भाविकांच्याशिवाय संपन्न झाला.
ठळक मुद्देदत्तभक्त, भाविकांच्याशिवाय श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तजयंतीभक्तीमय वातावरणात साध्या पद्धतीने श्री दत्त जन्मकाळ सोहळा