व्यंकटेश्वरा हायस्कूलच्या कोविड सेंटरची क्षमता वाढविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:49+5:302021-04-20T04:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहारातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कबनूर (ता. हातकणंगले) येथील व्यंकटेश्वरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहारातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कबनूर (ता. हातकणंगले) येथील व्यंकटेश्वरा हायस्कूलमध्ये सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमधील बेडची संख्या २०० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तीन शिफ्टमध्ये आवश्यक स्टाफ नियुक्त करण्यात येणार असून २६ ऑक्सिजन बेडची सोय करण्यात येणार आहे.
व्यंकटेश्वरा हायस्कूलच्या कोविड केअर सेंटरची आमदार प्रकाश आवाडे व नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पाहणीवेळी माहिती दिली. सध्या शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, शहर आणि परिसरात कोरोना महामारीचे संकट वाढत असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपालिका व आमदार आवाडे यांच्या सहकार्याने व्यंकटेश्वरा हायस्कूलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
या सेंटरमध्ये सुरुवातीस ११२ बेडची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या २०० बेडची सोय केली आहे. याठिकाणी ६० बेड ऑक्सिजनसाठी ठेवले असून, त्यामधील २६ बेड सुरू करण्यात आले आहेत. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, नगरसेवक सुनील पाटील, आदी उपस्थित होते.