शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

कोल्हापुरातील खंडपीठासाठी ७५ एकर जागेची मागणी, चर्चा २३ एकरांचीच; लोकप्रतिनिधींसह न्याय व्यवस्थेचीही उदासीनता

By उद्धव गोडसे | Published: June 29, 2023 11:26 AM

गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेल्या खंडपीठ मागणीच्या लढ्याला बळ देण्यासाठी जागेची तरतूद करावी, असा आग्रह खंडपीठ कृती समितीने धरला

उद्धव गोडसेकोल्हापूर : कोल्हापुरातील खंडपीठासाठी राजाराम कॉलेजच्या पाठीमागे आणि शेंडा पार्क असे दोन जागांचे प्रस्ताव समोर आले होते. त्यापैकी राजाराम कॉलेजच्या पाठीमागील जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने वगळला असून, आता शेंडा पार्कातील केवळ २३ एकर जागेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठीही लोकप्रतिनिधी आणि न्याय व्यवस्थेची उदासीनता आडवी येत आहे.गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेल्या खंडपीठ मागणीच्या लढ्याला बळ देण्यासाठी जागेची तरतूद करावी, असा आग्रह खंडपीठ कृती समितीने धरला. त्यानुसार जिल्हा बार असोसिएशनने २०१६ मध्ये पहिला मागणी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. त्यामध्ये शेंडा पार्क येथील ७५ एकर जागेची मागणी करण्यात आली होती. तो प्रस्ताव अनेक वर्ष प्रशासकीय पातळीवर प्रलंबित राहिला.दरम्यानच्या काळात अन्य शासकीय कार्यालयांनीही शेंडा पार्क परिसरात जागेची मागणी केली. त्यामुळे खंडपीठासाठी मागणी केलेल्या जागेवर परिणाम होऊ लागला. खंडपीठासाठी किमान ७५ एकर जमीन आरक्षित करावी, असा आग्रह सातत्याने बार असोसिएशनकडून सुरू आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. लोकप्रतिनिधींशी चर्चा झाल्या. त्यानंतरही केवळ २३ एकर जागा आरक्षित ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दर्शविल्याची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.औरंगाबाद खंडपीठाला ५६ एकरांची जागा मिळाली होती. सध्या ती जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठासाठी ५६ एकरांपेक्षा जास्त जागा मिळावी, असा प्रयत्न बार असोसिएशनकडून सुरू आहे. यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांतील सर्व महसूल मंत्री, मुंबई खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती, विधी व न्याय विभागाचे अधिकारी, काही केंद्रीय मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही.२३ एकरसाठीही यंत्रणा ढिम्मदेशातील अन्य राज्यांमध्ये नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांपासून ते न्याय व्यवस्थांनी एकत्र येऊन खंडपीठांचे प्रश्न मार्गी लावले. दुर्दैवाने कोल्हापुरातील चित्र उलटे दिसत आहे. ७५ एकरांची मागणी केली असता, केवळ २३ एकर जागेसाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. हा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे. अर्थात, यातील किती जागा खंडपीठासाठी मिळणार याबद्दल अजूनही साशंकताच आहे.

पूर्णवेळ मुख्य न्यायमूर्तींची गरजखंडपीठाचा निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायमूर्तींची गरज आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत काही अपवाद वगळता बहुतांश मुख्य न्यायमूर्ती प्रभारीच आहेत. सध्याही प्रभारी न्यायमूर्तींकडेच कार्यभार असल्याने कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय रखडल्याचे तज्ज्ञ सांगतात. मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत खंडपीठावर शिक्कामोर्तब झाल्यास तातडीने जागेच्या प्रश्नालाही गती येऊ शकते.ना हरकत प्रमाणपत्रांची गरजशेंडा पार्कातील जागा खंडपीठासाठी आरक्षित व्हावी यासाठी आरोग्य विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रांची गरज आहे. त्यासाठी दर महिन्याला बार असोसिएशनकडून संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला जात आहे. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांचीही नुकतीच भेट घेऊन बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले.

राजाराम कॉलेजच्या पाठीमागील ४० एकर जागेचा प्रस्ताव वगळल्याने आता केवळ शेंडा पार्कातील जागेचा पर्याय समोर आहे. किमान ७५ एकर जागेची गरज असताना केवळ २३ एकर जागेसाठी प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. याबाबत पुनर्विचार होण्याची गरज आहे. - ॲड. प्रशांत देसाई - अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय