दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 01:21 PM2020-06-10T13:21:29+5:302020-06-10T14:57:31+5:30

नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.

Destroy the insidious intrigue of those who paint Maratha against Dalit: MP Sambhaji Raje | दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

googlenewsNext
ठळक मुद्देदलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजेअरविंद बनसोड आणि इतरांना न्याय मिळाला पाहिजे

कोल्हापूर : नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.

नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत. या विषयावर खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे, की बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वत:च्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोक पुढे सरसावत आहेत, पण यामधून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होणार आहे.



चौकशीअंती या घटनांमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर तत्काळ अन कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाने दलितांवर अन्याय करु नये, परंतु त्याच वेळी काही कायद्यांचा चुकीचा वापर करून मराठा समाजावर सुद्धा अन्याय करु नये. जर अशाप्रकारे कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा मी तत्काळ विरोध केला आहे आणि करत राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

काही माथेफिरु लोक दोन्हीकडे असतात. त्या सर्वांना आपण बाजूला पाडलं पाहिजे. समाज हिताच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या एकीच्या दृष्टीने तेच योग्य आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या केवळ घोषणा देऊन काय उपयोग? त्यांचे विचार आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे महत्वाचे आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.

Web Title: Destroy the insidious intrigue of those who paint Maratha against Dalit: MP Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.