शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : जयंत आसगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:26 AM2020-12-06T04:26:22+5:302020-12-06T04:26:22+5:30

पुणे शिक्षक मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर त्यांचे शनिवारी सायंकाळी ताराराणी चौकात आगमन झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार आसगावकर म्हणाले, ...

Determined to solve teachers' problems: Jayant Asgavkar | शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : जयंत आसगावकर

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : जयंत आसगावकर

Next

पुणे शिक्षक मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर त्यांचे शनिवारी सायंकाळी ताराराणी चौकात आगमन झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार आसगावकर म्हणाले, पाचही जिल्ह्यांतील महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केल्याने हे यश मिळाले. ‘रयत’, ‘स्वामी विवेकानंद’, ‘डी. वाय. पाटील ग्रुप’, भारती विद्यापीठ, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यासह छोट्या-मोठ्या शिक्षण संस्थांचे पाठबळ मिळाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार, माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची मोलाची साथ मिळाल्याने विजय सोपा झाला. शिक्षण क्षेत्रापुढे अनेक प्रश्न आहेत, शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, शिक्षक-शिक्षकेतर भरती यासह प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.

फोटो ओळी : पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी घोषित करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुणे येथे शुक्रवारी सायंकाळी आमदार जयंत आसगावकर यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी के. के. पाटील, उदय पाटील, आदी उपस्थित होते. (फोटो-०५१२२०२०-कोल-आसगावकर प्रमाणपत्र)

- राजाराम लोंढे

Web Title: Determined to solve teachers' problems: Jayant Asgavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.