शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

दिलीप कुमार यांच्या कोल्हापुरातील वास्तव्याला मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:17 AM

कोल्हापूर : अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांनी भूमिका केलेल्या ‘राम और श्याम’ आणि ‘गोपी’ या चित्रपटांच्या ...

कोल्हापूर : अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांनी भूमिका केलेल्या ‘राम और श्याम’ आणि ‘गोपी’ या चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्त्ताने कोल्हापूर आणि पन्हाळगडावरील चित्रीकरणाच्या तसेच त्यांच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. कोल्हापूर आणि पन्हाळ्यातील ज्येष्ठ नागरिक, कलाकारांनी दिलीप कुमार यांच्या या चित्रीकरणाच्या आठवणी जतन केल्या आहेत.

पन्हाळा येथील डॉ. राज होळकर तसेच कोल्हापुरातील शाहीर राजू राऊत, जी. कांबळे यांचे चिरंजीव अशोक आणि बबन कांबळे, यशवंत भालकर यांचे चिरंजीव संग्राम भालकर यांनी त्यांच्या कोल्हापूर परिसरातील आठवणींना उजाळा दिला.

अभिनेते दिलीप कुमार यांचा १९६७मध्ये सुपरहिट झालेला ‘राम और श्याम’ आणि १९७०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोपी’ या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण पन्हाळा येथील राजवाड्यात, सोमेश्वर तलाव, जकात नाका, मेन रोड, पन्हाळा बसस्थानक या परिसरात जवळपास दोन महिने सुरु होते. होळकर यांच्या तबक उद्यानासमोरील विस्तीर्ण घराच्या परिसरात ‘राम और श्याम’ चित्रपटाच्या संपूर्ण युनिटचे दोन महिने वास्तव्य होते. यावेळच्या आठवणीही होळकर यांनी सांगितल्या.

यांनी केल्या होत्या भूमिका

‘राम और श्याम’ आणि ‘गोपी’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत कोल्हापुरातील अनेक कलाकारांनीही भूमिका केल्या होत्या. दिवंगत अभिनेत्री सरोज सुखठणकर यांनी ‘राम और श्याम’मध्ये काम केले होते. ‘गोपी’ चित्रपटातील एका दृश्यात दिलीप कुमार यांच्यासोबत काम केल्याची आठवण डॉ. राज होळकर, बहीण इरा आणि त्यांचे वडील जॉन होळकर यांनी सांगितली. कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील बालेचांद यांनीही ‘गोपी’मध्ये तर ज्येष्ठ पत्रकार वसंत सूर्यवंशी यांनी ‘मशाल’ चित्रपटात भूमिका केल्याची आठवण शाहीर राजू राऊत यांनी सांगितली.

‘जयप्रभा’पुढे झाले नतमस्तक

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओला दिलीप कुमार यांनी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता भेट दिली. भालजींची परवानगी घेत त्यांनी जयप्रभा स्टुडिओमध्ये प्रवेश केला आणि वाकून नमस्कार केला. भालजींनीही त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या खांद्याला हात लावून उभे केले. तेव्हा समोर खुर्चीवर न बसता त्यांनी बाबांसमोर मांडी घालत एका छोट्याशा रोलची विनवणी केली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची आठवण या घटनेचे साक्षीदार दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी त्यांच्या ‘मला भेटलेली मोठी माणसं’ या पुस्तकामध्ये सांगितली आहे.

फोटोग्राफर्स असोसिएशनला दिली भेट

दिलीप कुमार सायराबानूंसह कोल्हापूरमध्ये १९६६मध्ये जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, एम. बी. लोहिया यांच्यासमवेत कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को. ऑप असोसिएशनला भेट दिली. त्यावेळी संस्थेचे तत्कालीन संचालक व सभासदांसोबत छायाचित्र काढले होते. याचवर्षी ते मेढे तालमीच्या आणि तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उर्दूमिश्रीत हिंदीमध्ये त्यांनी संवाद साधला होता.

चिपळ्यांऐवजी वापरले टाळ, लाठीकाठीचे मिळाले प्रशिक्षण

‘गोपी’ चित्रपटात ‘रामचंद्र कह गये सियासे’ या गाण्याच्या चित्रीकरणप्रसंगी दिलीप कुमार यांना चिपळ्यांचा वापर करायचा होता, मात्र त्या न मिळाल्याने टाळ वापरण्यात आल्याची तसेच काही हाणामारीच्या दृश्यांसाठी त्यांना लाठीकाठीचे प्रशिक्षण कोल्हापुरातील मर्दानी आखाड्यातून देण्यात आल्याची माहिती शाहीर राजू राऊत यांनी दिली.

जी. कांबळे यांच्याबद्दल आदर

कोल्हापूरचे चित्रकार जी. कांबळे यांनी गाजलेल्या ‘मुघल ए आझम’ यासह ‘इन्सानियत’, ‘नया दौर’ या चित्रपटांची पोस्टर्स केली होती. के. असिफ यांनी अंधेरीतील मोहन स्टुडिओत जी. कांबळे यांच्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ दिला होता. इतकेच नव्हे तर दिलीप कुमारसोबत सोवळेकरीही वेगळा दिला होता. त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्टुडिओत व्यवस्था केली होती. या काळात त्यांच्या कन्या अंजनाचा दिलीप कुमार यांना चांगला लळा लागला होता. घरात तयार होणारी पुरणपोळी, अळूची भाजी, करंज्या, दिवाळीचा फराळ ते मागून घेत. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला तेव्हा जी. कांबळे यांची आठवण त्यांनी काढत त्यांच्यासारखा कलाकार होणे नाही, असे म्हटल्याची आठवण अशोक कांबळे यांनी सांगितली.

----------------------------------------------------------------------------

फोटो : 07072021-kol-dilip kumar visit at kolhapur photographar.jpeg

फोटोओळ : दिलीपकुमार सायराबानूसह कोल्हापूरामध्ये १९६६ मध्ये जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, एम. बी. लोहिया यांच्या समवेत कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को. ऑप असोसिएशनला भेट दिली. त्यावेळी संस्थेचे तत्कालीन संचालक व सभासदांसोबत छायाचित्र काढले होते.

फोटो : 07072021-kol-g kamble poster01.jpg

कोल्हापूरचे चित्रकार जी. कांबळे यांनी दिलिपकुमार यांची भूमिका असलेल्या मुघल ए आझम चित्रपटांचे पोस्टर्स केले होते.

फोटो : 07072021-kol-g kamble poster02.jpg

कोल्हापूरचे चित्रकार जी. कांबळे यांनी दिलिपकुमार यांची भूमिका असलेल्या मुघल ए आझम चित्रपटांचे पोस्टर्स केले होते.

070721\07kol_3_07072021_5.jpg~070721\07kol_4_07072021_5.jpg

फोटो : 07072021-kol-g kamble poster01.jpgकोल्हापूरचे चित्रकार जी. कांबळे यांनी दिलिपकुमार यांची भूमिका असलेल्या मुघल ए आझम चित्रपटांचे पोस्टर्स केले होते. ~फोटो : 07072021-kol-g kamble poster02.jpgकोल्हापूरचे चित्रकार जी. कांबळे यांनी दिलिपकुमार यांची भूमिका असलेल्या मुघल ए आझम चित्रपटांचे पोस्टर्स केले होते.