साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तनास दिशा-लक्ष्मीसेन महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:10 AM2017-09-26T00:10:39+5:302017-09-26T00:18:51+5:30

जयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल.

Direction of social change through literature conferences- Laxmisena Mahaswamy | साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तनास दिशा-लक्ष्मीसेन महास्वामी

साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तनास दिशा-लक्ष्मीसेन महास्वामी

Next
ठळक मुद्देजयसिंगपुरात मराठी जैन साहित्य संमेलनाची सांगतासमाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : मराठी जैन साहित्य संमेलन नक्कीच सामाजिक परिवर्तनाबरोबरच समाजोपयोगी असे आदर्शवत ठरेल. शहर शताब्दी वर्ष आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदरम्यान झालेला हा सोहळा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर मठाचे प.पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांनी केले. समाज बांधवांचे संघटन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जावे यासाठी समाज प्रबोधनाची शाखा जयसिंगपूरमध्ये स्थापन करीत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

येथील चौथ्या गल्लीत सोनाबाई इंगळे सभागृहात साहित्य पुरस्कार प्रदान व समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षा लीलावती शहा म्हणाल्या, संमेलन समिती संयोजकांनी संमेलनांचे नेटके आणि यशस्वी नियोजन केले आहे.
परिषदेचे मुख्यसचिव डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले, स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर खºयाअर्थाने शहर व परिसरात त्यांचे विचार जोपासण्याचे काम त्यांचे पुत्र राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रामाणिकपणे केले आहे.

स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी वसविलेल्या व शताब्दीवर्षात ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीत मराठी जैन साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमींचा ज्ञानोत्सव झाला.

राजेंद्र झेले यांनी स्वागत केले. सचिव प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गजकुमार शहा व अब्दुल रजपूत यांनी मनोगते व्यक्त केली. खासदार राजू शेट्टी यांनी संमेलनाला भेट दिली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, बी. टी. बेडगे, डॉ. अजित पाटील, सुरेश रेडेकर, विजय आवटी, डॉ. बी. ए. शिखरे, डॉ. सुरेश पाटील, पा. पा. पाटील, अ‍ॅड. धनपाल बेळंके, एम. के. घुमाई, डी. डी. मंडपे, सचिन पाटील, सागर अडगाणे, प्रा. आप्पा भगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद मगदूम यांनी केले. दादासो पाटील-चिंचवाडकर यांनी आभार मानले.

पुरस्काराने सन्मानित
प्राचार्य गजकुमार शहा यांना साहित्य पुरस्कार, सोलापूरच्या कवयित्री सोनल पाटील यांना रत्नत्रय पुरस्कार, शाहीर कुंतीनाथ करके यांना रत्नाक्का मिरजी साहित्य पुरस्कार, श्रीपाल जर्दे यांना क्रीडा पुरस्कार, विजापूरचे अब्दुल रजपूत यांना जैन शिल्प संरक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Web Title: Direction of social change through literature conferences- Laxmisena Mahaswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.