सीमाभागातील शैक्षणिक संकुलाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 10:09 AM2020-11-04T10:09:00+5:302020-11-04T10:12:21+5:30

Maharashtra, Karnatak, belgaon, Uddhav Thackeray, kolhapur, educationsector सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सुरू केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संकुलाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मुंबईत चर्चा झाली.

Discussion with the Chief Minister about the educational complex in the border areas | सीमाभागातील शैक्षणिक संकुलाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

सीमाभागातील शैक्षणिक संकुलाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देसीमाभागातील शैक्षणिक संकुलाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा बृहत आराखड्यामध्ये नोंद झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती

कोल्हापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सुरू केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संकुलाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मुंबईत चर्चा झाली.

गेल्या तीन दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सीमाभागातील या संकुलाची सुरुवात करण्यासाठी त्याची राज्याच्या बृहत आराखड्यामध्ये नोंद करण्याबाबत मुंबईत बैठक होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षण व विकास आयोगाची बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झाली.

या संकुलाची बृहत आराखड्यामध्ये नोंद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री सामंत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी, आदी उपस्थित होते. दरम्यान, या बृहत आराखड्यामध्ये नोंद झाल्यानंतर शैक्षणिक संकुलाबाबतच्या पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे.

 

Web Title: Discussion with the Chief Minister about the educational complex in the border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.