कोल्हापूर : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. के.गु्रपचे मालक संशयित डी. एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यावर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे फसवणुुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी बुधवारी फेटाळला.बांधकाम व्यावसायिक डी.एस.कें.च्या विरोधात मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. पुणे व कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत डी.एस.कें.च्या ५०० मालमत्ता सील केल्या आहेत.
त्याच्या वकिलांनी आमच्याविरोधात दाखल असलेल्या फिर्यादी रद्द करा, म्हणून उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी या तिघांच्या अटकेची तयारी केली आहे. दरम्यान, कुलकर्णी दाम्पत्याने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतल्यास त्यांच्याविरोधात आम्ही अपील दाखल करणार असल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी सांगितले.