मुरगूडमध्ये एक हजारजणांना घरगुती साहित्य वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:29+5:302021-05-25T04:27:29+5:30

कोरोना प्रतिबंधासाठी कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब व गरजू जनतेला याचा चांगलाच फटका बसला आहे. ...

Distributed household items to one thousand people in Murgud | मुरगूडमध्ये एक हजारजणांना घरगुती साहित्य वितरित

मुरगूडमध्ये एक हजारजणांना घरगुती साहित्य वितरित

Next

कोरोना प्रतिबंधासाठी कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब व गरजू जनतेला याचा चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या रोजच्या जेवणाचेही हाल होताना दिसत आहेत. या सर्वांचा विचार करून येथील लाल आखाडा व्यायाम मंडळ व विश्वजितसिंह रणजितसिंह पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने मुरगूड आणि मुरगूड परिसरातील सुमारे दहा हजार गोरगरीब व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचे युवा नेते विश्वजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमासाठी सईस राव, ओंकार पाटील, संजय डेमडा, सतीश कटियार, श्याम सलुजा, सूरज पटेल, अन्वित पाटील, हर्षवर्धन माने (खानापूरकर), किरण पाटील, वैभव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. साहित्य वितरित करताना आप्पाजी मेटकर, शुभम गायकवाड, प्रशांत डेळेकर, मयूर गुजर, प्रणव कदम, ओंकार खंडागळे, प्रशिल मेटकर, विश्वजित रामाने, गणेश चौगले, पवन भीके, पृथ्वीराज मेटकर, विशाल शेनवी, सौरभ वंडकर, संकेत बारड, साहिल मोरबाळे, प्रशांत देसाई, अक्षय हासबे हजर होते.

Web Title: Distributed household items to one thousand people in Murgud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.