सडोली (खालसा) : कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र सेवा बजावत असलेल्या डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार व गरजू व्यक्तींना कोल्हापूर हेल्पिंग यूथच्या वतीने फूड पॅकेज वाटप करून सामाजिक बांधीलकी जपली.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. लोकांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्य सुविधेसाठी अनेक पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे दिवस-रात्र आपली सेवा बजावत आहेत. कोल्हापूर हेल्पिंग यूथच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गेले आठ दिवस कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, गरजूंना फूड पॅकेज वाटप करण्यात आले.
फोटो ओळ
कोल्हापूर हेल्पिंग यूथच्या वतीने पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार व गरजूंना फूड पॅकेज वाटप करण्यात आले.