हुपरी: समाजातील लोप पावत चाललेली तत्वनिष्ठा कायम टिकून राहावी. सामाजिक संस्काराचे होत चाललेले अध:पतन थांबावे. तसेच भावी पिढीवर योग्य प्रकारचे धार्मिक व आध्यात्मिक संस्कार व्हावेत व सामाजिक चळवळीला नव्याने ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी. या हेतूने येथील तरुण चांदी उद्योजक विवेक व रवी विलासराव नाईक यांनी आईच्या निधनानंतर उत्तर कार्याच्या दिवशी पंचपक्वान्न जेवणाचे आयोजन न करता एक हजार भगवद्गीता धर्म ग्रंथाचे घरपोच वाटप केले.
हुपरी परिसरातील सहकार व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे नाईक कुटुंब. या कुटुंबातील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेचे व चांदी कारखानदार असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक विलासराव यशवंतराव नाईक यांच्या पत्नी विद्या विलास नाईक यांचे १३ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्यानिमित्त सांत्वनासाठी भेटून गेलेल्या व्यक्तीं प्रती ऋण मानण्यासाठी एक हजार जणांना भगवद्गीता धर्म ग्रंथ घरपोच केला. आपल्या आईच्या उत्तरकार्यादिवशी हा धर्म ग्रंथ भेट देऊन एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवून नाईक कुटुंबाने आईला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
---------::--------
फोटो - २५ विद्या नाईक