कोरोनाच्या लॉकडाऊन काळात दूध उत्पादक सभासदांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यातच घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर औषधोपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. कोरोनाच्या काळात दूध उत्पादकांना आर्थिक मदत दिली जावी व त्यांना आर्थिक आधार दिला जावा या हेतूने संचालक मंडळाने दूध उत्पादकांना लिटरला ३ रुपयांप्रमाणे लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्याप्रमाणे ४० दूध उत्पादक सभासदांना २ लाखांचे वाटप करण्यात आले. रकमेचे वाटप करताना उपाध्यक्षा कांचन गुरव, संचालक यशोदा गुरव, स्मिता तावडे, लीला कांबळे, राजश्री गुरव, महादेवी गुरव, लक्ष्मी कांबळे, सचिव महादेव गुरव, भिकाजी गुरव, दिगंबर धुरी, सहदेव गुरव, संभाजी तावडे, रणजित पोवार, बाळासाहेब तावडे यासह दूध उत्पादक उपस्थित होते. विजय गुरव यांनी आभार मानले.
--------------------------
फोटो ओळी : हाळोली (ता. आजरा) येथील श्रीकृष्ण दूध संस्थेच्या वतीने कोरोनासाठी आर्थिक मदतीचे वाटप करताना अध्यक्षा लता तावडे.
क्रमांक : ०९०५२०२१-गड-०५