जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत

By admin | Published: September 22, 2015 11:18 PM2015-09-22T23:18:26+5:302015-09-22T23:50:29+5:30

काव्या शहा, प्रणेत भोसले अजिंक्य

In the district level table tennis tournament | जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत

Next

कोल्हापूर : राजारामियन क्लब येथे कै. डॉ. मा. ना. जोशी व कै. मधुकर टाकळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षांखालील गटात काव्या शहा व प्रणेत भोसले यांनी अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस संघटना व राजारामियन क्लब यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा : १० वर्षांखालील गटात, मुलींत : काव्या शहा, मैत्रेयी कुंभोजकर, मधुरा शेंडुरे, नारायणी मुधोळकर. मुलांत : प्रणेत भोसले, आदर्श पाटील, अमय यादव. १२ वर्षांखालील मुलींत : श्रेया पाटील, आर्या कालवडकर, मैत्रेयी कुंभोजकर, दिशा देशपांडे. मुलांत : अद्वैत बोंद्रे, सुजल सुतार, आदित्य पाटील, सुमंता साळुंखे. १५ वर्षांखालील गटात, मुलींत : मधुरा वाळवेकर, क्षिती देशपांडे, उत्कर्षा केसरकर, रेश्मा राठोड. मुलांत : चैत्राल मुळ्ये, वेदांत कुलकर्णी, राजवर्धन पाटील, चिनार संकपाळ. १७ वर्षांखालील गटात, मुलींत : मधुरा वाळवेकर, ईशानी जोशी, ईशा स्वार, ईश्वरी देशपांडे. मुलांत : चैत्राल मुळ्ये, चिनार संकपाळ, स्वराज साळोखे, झाईद स्वार. युवा महिला : ईशा स्वार, मधुरा वाळवेकर, ईशना राठोड, ईश्वरा देशपांडे. पुरुष : अजिंक्य भोसले, स्वराज्य साळुंखे, सुशील बागवडे, भावेश राठोड. पुरुष खुला : विवेक कुंभार, अभिषेक टोपले, अजय देशपांडे, अजिंक्य भोसले. अपंग गटात : नागेश सुतार, विवेक मोरे.
विजेत्या खेळाडूंना घाटगे ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे चेअरमन मोहन घाटगे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी डॉ. दीपक जोशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा जोशी, जिल्हा संघटनेचे सचिव शीतल भोसले, आनंदिता बसाक, गिरीश मुळ्ये, आदी उपस्थित होते.

Web Title: In the district level table tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.