डीकेटीईची अश्विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:16+5:302021-03-25T04:23:16+5:30

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीमार्फत गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची ॲनालिटिकल थिंकिंग, टेक्निकल नॉलेज ...

DKTE's Ashwini Kanekar first in the country in gate examination | डीकेटीईची अश्विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

डीकेटीईची अश्विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

Next

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीमार्फत गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची ॲनालिटिकल थिंकिंग, टेक्निकल नॉलेज व रिसर्च ओरिएंटेड स्किल्स याची चाचणी होते. यावर्षी एकूण साडेसात लाख विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली. त्याचा १८ टक्के निकाल लागला. म्हणजे एकूण एक लाख ३५ हजार विद्यार्थी पात्र ठरले. त्यामध्ये टेक्स्टाईल विभागातून अश्विनी हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला. डीकेटीईमध्ये ॲटोनॉमसमुळे जगातील वेगवान तंत्रज्ञानाच्या बदलांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच गेटच्या तयारीसाठी गेली दहा वर्षे खास प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. अश्विनी हिचा पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण करून संशोधक म्हणून करिअर करण्याचा मानस आहे. अश्विनी हिला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी

२४०३२०२१-आयसीएच-०१ - अश्विनी कणेकर

Web Title: DKTE's Ashwini Kanekar first in the country in gate examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.