साखर आयात करून शेतकºयांचे वाटोळे करू नये : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:03 PM2017-09-08T20:03:36+5:302017-09-08T20:06:47+5:30

कोल्हापूर : पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे.

 Do not distort farmers by importing sugar: Raju Shetty | साखर आयात करून शेतकºयांचे वाटोळे करू नये : राजू शेट्टी

साखर आयात करून शेतकºयांचे वाटोळे करू नये : राजू शेट्टी

Next
ठळक मुद्दे सणासुदीच्या तोंडावर सरकारचा डावपृथ्वीराज चव्हाण यांनी ही समिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यंदा साखरेचे दर स्थिर राहिल्याने आता कोठे साखर कारखाने व शेतकºयांचे बरे चालले असताना त्यात ढवळाढवळ करून शेतकºयांचे वाटोळे करण्याचा उद्योग केंद्राने करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

शेट्टी म्हणाले, देशातील साखरेचा साठा तसेच दीड महिन्यात नवीन हंगाम सुरू होत असल्याने साखर आयात करण्याची गरज भासत नाही. याबाबत लवकरच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन आयातीला विरोध दर्शविणार आहे. ऊस दर नियंत्रण समितीची बुधवारी (दि. १३) बैठक आहे. यामध्ये खासगी व सहकारी साखर कारखान्यांना आपला ताळेबंद सादर करावा लागेल. साखर आयुक्तांनी हिशेब तपासल्यानंतर अंतिम दराबाबत निर्णय होणार आहे. आतापर्यंत ‘एफआरपी’पेक्षा जादा दर मिळालेला नाही; पण या वर्षी साखरेचे दर चांगले राहिल्याने बहुतांश कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर द्यावाच लागेल. ऊस दर नियंत्रण समिती ही घटनात्मक असल्याने त्याच्याशी भाजपचा संबंध नाही. कॉँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही समिती स्थापन केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ते तर शिवसेनेचे अनुभवाचे बोल!
भाजपने ‘स्वाभिमानी’ फोडल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना शेट्टी म्हणाले, शिवसेनेचे अनुभवाचे बोल आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याने मी पळवून नेणाºयांना नाही तर पळून जाणाºयांना दोष देतो.
 

 

Web Title:  Do not distort farmers by importing sugar: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.