गांधीनगर : घरगुती विद्युत पुरवठा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला. आरपीआय कार्यकर्त्यांनी गडमूडशिंगी येथे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबेकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकार संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा करत नाही तोपर्यंत विद्युत मंडळाने कोणाचाही विद्युत पुरवठा बंद करू नये, बिल भरण्यासाठी तगादा लावू नये, अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे शाखाध्यक्ष दादासाहेब कांबळे, अविनाश कांबळे, अभिजीत कोगले, रामचंद्र कांबळे, उत्तम कांबळे, संतोष कांबळे, प्रीतेश आकुर्डे, हरीश गोंधळी, सनी गोंधळी उपस्थित होते. फोटो: २० गांधीनगर आंदोलन
ओळ:- गडमूडशिंगी येथील आरपीआय (आ. गट) यांच्या वतीने विद्युत पुरवठा बंद करण्याची कारवाई थांबवा, या मागणीचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबेकर यांना देण्यात आले.