निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कागवाडे मळा परिसरातील डॉ. भाऊसाहेब काटकर याच्या काटकर हॉस्पिटलवर पोलीस व आरोग्य विभागाने धाड टाकून प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करत असताना डॉ. काटकर याला रंगेहात पकडले. गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असूनदेखील डॉक्टरने चाचणी केली. यापूर्वीही सन २००९ साली डॉ. काटकर याला याच कारणामुळे अटक झाली होती. तरीही डॉक्टरास कोणतेही भय नाही. गर्भलिंग निदान करणे हा स्त्री जातीचा अपमान असून या निदानामुळे अनेक मुलीचे जन्म होण्याआधी त्याचा बळी घेतला जातो. त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करून या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा. तसेच यातून मिळविलेली मालमत्ता जप्त करावी; अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात नगरसेविका उमा गौड, शोभा कोलप, मंगल चव्हाण, मंगल मुसळे, हसीना शेडबाळे, सुवर्णा धनवडे, आदींचा समावेश होता.
डॉ. काटकरसह दोषींवर कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:29 AM