प्रसारमाध्यमांचा वाईट प्रवृत्तींवर धाक
By admin | Published: April 23, 2015 12:03 AM2015-04-23T00:03:46+5:302015-04-23T00:28:17+5:30
सतीश पत्की : महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे पत्रकारांचा गौरव
कोल्हापूर : समाजातील वाईट प्रवृत्तींवर माध्यमाचा धाक आहे, त्यांच्यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळतो, असे प्रतिपादन विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी केले. येथील महालक्ष्मी भक्त मंडळ संचलित धर्मशाळेच्या ६१व्या वर्धापनदिनी कोल्हापुरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पत्की बोलत होते.
समाजात पत्रकार आहेत म्हणून चांगल्या गोष्टींचे कौतुक होते आणि वाईट गोष्टींचा पर्दाफाश होतो. समाजातील उपेक्षित घटकांना, पीडितांना त्यांच्यामुळे न्याय मिळतो हे वास्तव आहे. वाईट प्रवृत्तींवर पत्रकारांचा अंकुश असणे ही विशेष बाब आहे, असे डॉ. पत्की म्हणाले. यावेळी भारत चव्हाण (लोकमत), शरद तांबट (मुक्त पत्रकार), सचिन ठिकपुर्ले (पुढारी), बाळासाहेब पाटोळे (पुण्यनगरी), राजेश मोरे (सकाळ), अमरसिंह पाटील (बी न्यूज), शीतल धनवडे (सामना), अमित गद्रे (महाराष्ट्र टाईम्स), अमोल माळी (बी न्यूज), सुभाष गायकवाड (एस न्यूज), अश्विनी टेंभे (केसरी), पूजा मराठे (पुढारी), संग्राम काटकर (तरुण भारत), विश्वास कोरे (दूरदर्शन) आदींचा गौरव करण्यात आला. े यावेळी राजू मेवेकरी, अध्यक्ष नंदकुमार मराठे, राजाभाऊ जोशी उपस्थित होते.