मळगे-बानगे दरम्यान असणाऱ्या मुख्य ओढ्याला समांतर पूर्व बाजूला लहानसा ओढा आहे. मात्र,पुराच्या वेळी मुख्य ओढ्यातील जादाचे पाणी या ओढ्यात पडल्याने या रस्त्यानजीक मोठा डाेह तयार झाला आहे.
ओम पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच बहीण पूजा आरडाओरडा करत भावाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरली.मात्र,तिलाही पोहता येत नव्हते. यावेळी शेजारी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी या दोघांनाही बाहेर काढले. मात्र,ओम मृतावस्थेत होता. तर पूजाला कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेनंतर आई-वडिलांसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी घरगुती वादातून आपल्या दोन्ही मुलासह पत्नी माहेरी राहत होती. दोन दिवसापूर्वी वादावर पडदा टाकत मुले मळगे येथे आली होती.मात्र,दुर्दैवाने एकुलत्या मुलावर नियतीने घाला घातल्याने हे कुटुंब सुन्न झाले आहे.
बानगे-मळगे नजीक असणारा डोह