दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रचंड तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:55 PM2018-12-13T12:55:56+5:302018-12-13T13:11:51+5:30

कोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती कडील व्यापारी व हमाल यांच्यातील वादामुळे गूळ सौदे दोन दिवस झाले बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा झालेली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले व बाजार समिती ठप्प केली .

Due to decrease in prices, the farmers stopped the deal, tremendous tension in the Kolhapur market committee | दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रचंड तणाव

दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रचंड तणाव

googlenewsNext
ठळक मुद्देदर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंदकोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रचंड तणावबाजार समिती शेतकऱ्यांनी केली ठप्प

कोल्हापूरकोल्हापूर-शेती उत्पन्न बाजार समिती कडील व्यापारी व हमाल यांच्यातील वादामुळे गूळ सौदे दोन दिवस झाले बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा झालेली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले व  बाजार समिती ठप्प केली.

इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या विरोधात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केले. 

गुळ पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांकडून बाजार समिती धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त  करण्यात येत होते. शेतकरी बाजार समितीत जमा झाले. परिणामी प्रवेशद्वाराजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बाजार समितिच्या प्रवेशद्वारावर हजारो वाहने थांबून राहिली. शेतकऱ्यांनी तेथेच ठिय्या मारला होता. 

शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झालेले  पाहून  प्रवेशद्वार बंद करण्यात आले.  यामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे कांदा-बटाटा, गुळासह इतर बाजारातील सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.

Web Title: Due to decrease in prices, the farmers stopped the deal, tremendous tension in the Kolhapur market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.