Mucormycosis In Kolhapur : म्यूकरवरील उपचार आणखी पाच रुग्णालयांत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 12:12 PM2021-06-09T12:12:48+5:302021-06-09T12:16:04+5:30

Mucormycosis In Kolhapur :म्यूकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारासाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या आणखी पाच रुग्णालयांचा मंगळवारी समावेश करण्यात आला.

During the day, seven patients with mucorrhoea increased | Mucormycosis In Kolhapur : म्यूकरवरील उपचार आणखी पाच रुग्णालयांत होणार

Mucormycosis In Kolhapur : म्यूकरवरील उपचार आणखी पाच रुग्णालयांत होणार

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा निर्णय : महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार दिवसभरात म्युकरमायकोसिसचे सात रुग्ण वाढले, ९८ जणांवर उपचार सुरू

कोल्हापूर : म्यूकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारासाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या आणखी पाच रुग्णालयांचा मंगळवारी समावेश करण्यात आला. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणार आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची सोय नाही तेथील रुग्णांवर सीपीआर किंवा डी. वाय. पाटील रुग्णालयात शस्त्रक्रिया करून पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयामध्ये पाठवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे ९६ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे वाढते रुग्ण व उपचारांचा अभाव या पार्श्वभूमीवर दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व ईएनटी असोसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. रंजना मोहिते, डॉ. हर्षला वेदक उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयाने ऑपरेशन थिएटर विनामूल्य वापरासाठी देण्याचे मान्य केले आहे. येथे अन्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवरदेखील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी ईएनटी सर्जन उपलब्ध नाहीत तेथे ईएनटी असोसिएशनतर्फे सर्जन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ज्या ईएनटी सर्जन यांना म्युकर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे त्यांनी सीपीआरमधील डॉ. अजित लोकरे यांच्याशी संपर्क साधून प्रशिक्षण घ्यावे, शासकीय व खासगी रुग्णालयांनी रुग्णांची दैनंदिन माहिती विहीत नमुन्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला सादर करावी, महात्मा फुले योजनेतील ज्या रुग्णालयांना म्युकर रुग्णांवर उपचार करायचे असेल त्यांनी तत्काळ सीपीआरमध्ये प्रस्ताव सादर करावा.
यावेळी डॉ. गीता आवटे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. विशाल चौगुले, डॉ. तुषार जोशी, गुरुदास बन्ने, डॉ. यशवंत चव्हाण यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

उपचारासाठी ५२ लाखांची उपकरणे

सीपीआरमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांवर सर्वाधिक शस्त्रक्रिया होत आहेत, त्यामुळे येथे ५२ लखाांचे दोन अतिरिक्त इन्डोस्कोपिक सर्जरी सेट व अन्य उपकरणे खरेदी करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यास मालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्यता दिली आहे. यामुळे सीपीआरमध्ये एकाचवेळी तीन शस्त्रक्रिया होणार आहेत.

ही आहेत रुग्णालये..

म्युकर रुग्णांवर सध्या सीपीआरसह महात्मा फुले योजनेत समाविष्ट असलेल्या ॲपल, सिद्धगिरी, डायमंड, डी. वाय. पाटील, केएलई बेळगाव या रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. मुंबईतील राज्य हमी सोसायटीने कोल्हापूर कॅन्सर सेंटर, अथायू, केपीसी, निरामय, संत गजानन महाराज महागांव या रुग्णालयांना मान्यता दिली आहे. इचलकरंजीतील अलायन्स हॉस्पिटलचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. डी. वाय. पाटील व ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणी सवलतीच्या दरात करून देण्यात येणार आहेत.

दिवसभरात म्युकरमायकोसिसचे सात रुग्ण वाढले

कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी त्यामध्ये आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. सध्या सीपीआर आणि खासगी रुग्णालयात ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत एकूण १२४ नागरिकांना म्युकरची लागण झाली होती. त्यापैकी १९ जण यातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. सीपीआरमध्ये ८३ तर खासगी रुग्णालयात ३६ जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: During the day, seven patients with mucorrhoea increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.