ग्रामपंचायतींना जादा निधी देण्यासाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:18 AM2020-06-10T06:18:22+5:302020-06-10T06:18:52+5:30

मंत्री हसन मुश्रीफ : ‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’ आयोजित ‘सरपंच खरा योद्धा’ वेबिनारमध्ये ग्वाही

Efforts are being made to provide extra funds to the Gram Panchayats | ग्रामपंचायतींना जादा निधी देण्यासाठी प्रयत्नशील

ग्रामपंचायतींना जादा निधी देण्यासाठी प्रयत्नशील

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमध्ये गावागावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांनी ‘कोरोना योद्धे’ म्हणून मोठे काम केले आहे. त्यामुळेच शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रोखण्यात यश आले. यासाठी ग्रामपंचायतींना खर्चही आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना जादा निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’ यांच्या वतीने आयोजित ‘सरपंच खरा योद्धा’ या विषयावरील वेबिनारमध्ये मुश्रीफ यांनी या सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन करताना ‘लोकमत’लाही या उपक्रमासाठी धन्यवाद दिले. या वेबिनारमध्ये ‘बीकेटी टायर्स’चे राजीव कुमार, प्रमुख मार्गदर्शक माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अन्य मार्गदर्शक पद्मश्री पोपटराव पवार, पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील, सरपंच परिषदेचे संस्थापक-विश्वस्त अविनाश आव्हाड, अमरावती जिल्ह्णातील आदर्श ग्राम खिरगव्हाणचे आदर्श व सरपंच सेवा महासंघाचे पुरुषोत्तम घोगरे-पाटील सहभागी झाले होते.
या सर्व मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा आढावा घेऊन मुश्रीफ म्हणाले, गावात परतलेल्यांसाठी ‘मनरेगा’ची कामे सुरू करणे, कोरोनाची ग्रामीण भागाची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करणे, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळताच त्याचे वितरण करणे, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री निधीतून काही निधी ग्रामपंचायतींना देता येईल का ते पाहणे यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामविकासाच्या बाबतीत महाराष्ट्राने देशभरात मोठे काम केले आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने यात भर घालण्याचे काम करू.
ग्रामपंचायतींची वर्गवारी करून
निधी द्यावा : पोपटराव पवार
पोपटराव पवार म्हणाले, महाराष्ट्रातील २८ हजारांपैकी २२ हजार ग्रामपंचायती तीन हजार लोकसंख्येच्या आतील आहेत. लोकसंख्येच्या आधारावरील निधी वाटपाच्या धोरणामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. त्यापेक्षा शहरी, वनक्षेत्रातील, आदिवासी, दुष्काळी आणि पाणी सुविधा असलेल्या ग्रामपंचायती अशी वर्गवारी करून निधीचे वितरण केले जावे. ‘आपलं सरकार’ या पोर्टलसाठी गावातील युवकांना संधी द्यावी. ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्ती अभियान पुन्हा नव्याने सुरू करावे.

भास्कर पेरे-पाटील म्हणाले, सरपंच कोरोनाच्या काळातच योद्धा झालेला नाही. तो पहिल्यापासूनच योद्धा म्हणून काम करतो. ग्रामविकासाच्या बाबतीत काम सुरू आहे. मात्र त्याला म्हणावा तसा वेग आलेला नाही. अजूनही अनेक गावांमध्ये दयनीय अवस्था आहे. यासाठी आणखी जोर पकडावा लागणार आहे.

अविनाश आव्हाड म्हणाले, कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंचांचे मानधन थकीत आहे. ते लवकर अदा करावे. ग्रामपंचायतींवर अचानक प्रशासक आणणे हेदेखील योग्य नाही. पुरुषोत्तम घोगरे-पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी आणि त्याचे व्याजही शासनाने परत घेतले. ग्रामपंचायतीचे उत्पन्न अडीच लाख रुपये आणि त्यातील एक लाख ४८ हजार रुपये संगणक परिचालन करणाºयाला द्यावे लागतात. त्यापेक्षा हा आॅपरेटर नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला द्या.
अनिरुद्ध हजारे यांनी स्वागत करून या वेबिनारमागील ‘लोकमत’ची भूमिका सांगितली. संकर्षण कराडे यांनी सूत्रसंचालन केले. वेबिनारमध्ये सहभागी सर्वांनीच ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. पुढच्या काळात ग्रामविकासाच्या कार्यात ‘लोकमत’च्या नेतृत्वाखाली उपक्रम घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

चंद्रकांत दळवी यांच्या सूचना
च्राज्यातील ग्रामपंचायतींना विशेष कोरोना निधी द्यावा.
च्गावाकडे आलेल्या नागरिकांना ‘मनरेगा’ची कामे द्या.
च्कोरोनाग्रस्तांची ग्रामीण भागाची स्वतंत्र आकडेवारी द्यावी.
च्सरपंच परिषदा घेऊन नवे व्यासपीठ निर्माण करावे.
च्संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त अभियान नव्या निकषांनुसार सुरू करावे.

आजरा तालुक्यातील महिला सरपंचांचा उल्लेख
आजरा तालुक्यातील मसोली गावच्या सरपंच छायाताई पोवार या कोरोनाकाळात काम करताना पडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना शासनाकडून अर्थसाहाय्य मिळावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे अविनाश आव्हाड यांनी केली.

Web Title: Efforts are being made to provide extra funds to the Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.