आंबा : पुण्याहून गणपतीपुळ्याला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील तळवडे वळणावरील झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतामध्ये दोन कुंटूबातील दोन बालके, तीन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. सकाळी साडे दहाला हा अपघात झाला.
मृतांमध्ये चालक प्रशांत सदाशिव पाटणकर (वय ४0, रा. भागिरथी
संतोष राऊत
पुणे येथील सेनापती बापट मार्गावरील यार्डी सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कपंनीत हे तिघे मित्र नोकरीस होते. पाटणकर हे वरिष्ठ पदावर होते तर राऊत आणि शेळकंदे सी.एस.आर म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करीत होते.
दिपक बुधाजी शेळकंदे
पाटणकर यांच्या पिंटो कारने (एम.एच.११ए.डब्लू ६६००) हे तिघेजण कुटंूबासह पहाटे गणपतीपूळ््यास निघाले होते. गाडीत तीन बालकासह आठजण होते. सलग तीन दिवसाच्या सुट्टीमुळे त्यांनी कोकण सहलीचे नियोजन केले होते. शाहुवाडी तालुक्यातील मलकापूरनंतर आंब्याजवळील तळवडे वळणावर चालक पाटणकर यांचा ताबा सुटला. गाडी भरधाव वेगात असल्यामुळे ती महामार्गाच्या डाव्या बाजूवरील आंब्याच्या झाडावर आदळली.
प्रशांत सदाशिव पाटणकर
या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले तर दोन बालके मलकापूर येथील रूग्णालयात तर चालक पाटणकर कोल्हापूरच्या सी.पी.आर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्युमूखी पडले. जखमी वरूणा आणि यज्ञा यांच्यावर सी.पी.आर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
या अपघातात कृष्णा दळवी, निलेश कामेरकर, गणेश शेलार, मारूती पाटील, राजेंद्र लाड, दत्ता गोमाडे, लक्ष्मण घावरे, शंकर डाकरे या ग्रामस्थांनी मदत केली. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने अपघातास्थळी पोहचून महामार्ग वाहतूकीस खुला केला.
पोलिस अधिक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधिक्षक आर. आर.पाटील यांनी घटनास्थळी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमाारास भेट दिली. प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या सलग सुटट््यांमुळे कोकणाकडे जाणाऱ्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणातात वाहतूक सुरु होती. अपघाताची भीषणता पाहून धडकी भरत होती. माय-लेक बचावलेदैव बलवत्तर म्हणून वरूणा शिलकंदे आणि त्यांची मुलगी यज्ञा आश्चर्यकारकरित्या बचावली. गाडीत त्या एकत्र बसल्या होत्या. तीन वर्षाच्या यज्ञाच्या डोक्याला मार बसला आहे. अपघातात पती व मुलगा ठार झाल्याचे समजल्यानंतर त्या सुन्न झाल्या. दुपारपर्यत ओळख पटत नव्हती. वरूण कुठे आहे अशी आर्त ओरड समोरच्यांचे मन हेलावत होते. मोबाईलवरून नातेवाईकांचा शोध घेवून अपघाताचे वृत्त कळविले गेले. तीन वाजता कंपनीतील मित्र प्रथम येथे दाखल झाले, तर राऊत यांचा मेहुणे अक्षय गवळी साडे सहा वाजता घटनास्थळी आले. दिपक यांचा भाऊ सात वाजता मलकापूरात आले, त्यानंतर मृतांची ओळख पटली. शिळकंदे कुंटूब मूळचे जुन्नर मधील भिवाडी गावचे असून ते दहा वषार्पूर्वी ते नोकरीसाठी पुण्यात स्थायिक झाले होते तरराऊत मूळचे लातूरचे आहेत. या अपघातानंतर या साऱ्या कुंटूबावरच काळाने घाला घातला आहे. त्यांच्या आईचे लहानपणीच निधन झाले तर त्यांच्या पश्चात वडील व एक भाऊ आहे. रात्री नऊ वाजता शवविच्छदन करुन या सहाजणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास पोलिस निरिक्षक एम्मोवार, पोलिस हवालदार शेडगे, आर.एस.दांगट, जानकर आदी करीत आहेत.
भीषण अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर
या भीषण अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला तर कारचे इंजिन मागील सिटपर्यत चेपत गेले होते. प्रचंड वेगामुळे गाडी झाडाला ठोकरून उलटया दिशेने फिरली होती. मागील सीटखाली रक्ताचा सडा पडला होता. गाडीचा दरवाजा मोडून दोघे बाहेर फेकले गेले होते.
छोट्या वरूणचे कान टोपडे आणि दुधाची बाटली रक्त्याच्या थारोळ्यात पडली होती. कारच्या स्पिड मिटरचा काटा १२० वर स्थिरावला होता, तर गाडीचे लाईटचे कव्हर चाळीस फूटावर पडले होते. सीट तोडून अडकलेल्या प्रशांतला मोकळे केले गेल.
अपघात स्थळाचे दुश्य मन सुन्न करणारे होते. चार जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी तातडीची मदत पुरवून अर्ध्या तासात १०८ रुग्णवाहिकेने मलकापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. दिपक, संतोष आणि अपर्णा यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने ते जागीच ठार झाले होते तर प्रशांतच्या छातीला स्टेअरिंगचा मुका मार बसला होता. प्रचंड वेगामुळे गाडीतील एअर बॅगही त्यांना वाचवू शकली नाही. मलकापूरपर्यत ते शुध्दीवर होते, मोठ्या अपघाताचा त्यांच्यावर मोठा ताण दिसत होता. अपघातानंतर पाच तास त्यांनी मृत्युशी झुंज दिली.
जीवघेणी वळणेमलकापूर ते आंबाघाट या दरम्यानच्या सोळा किलो मिटर मार्गावर वालूर, वारूळ पूल, केर्ले पूल तळवडे आणि हसूकीचे वळण अपघाताचे जणू सापळेच बनले आहेत. गेल्या आठवड्यात केर्ले येथे दोन मोटारसायकलस्वार ठार झाले होते. तसेच गेल्या वर्षी या अपघातस्थळाच्या मागे दहा फूटावर झालेल्या कार अपघातात चार मुस्लीम बांधव ठार झाले होते. दरवर्षी या आठ किलोमिटरच्या मार्गावरील नागमोडी वळणावर २ ते ३ मोठे अपघात घडतात. या वळणावर सुचना फलक, बाजूपट्टयाची बांधणी, ग्रील उभारणी आणि पूलाला कठडे बांधणे आवश्यक आहे. धुक्यातून वळण दिसणारे रिफ्लेक्टरची गरज आहे.नाष्टाचा फोन अखेरचा..प्रशांत पाटणकर वाटेत सातारा येथे सकाळी आठ वाजता नाष्टा घेण्यास एका हॉटेलवर थांबले होते. तेथून त्यांनी कंपनीचे अधिकारी प्रविण जमदाडे यांना फोन केला. नाष्टा करून आम्ही कोकणाकडे जात असल्याचे कळवले. ते त्यांच अखेरचे बोलणे ठरले. त्यानंतर अकरा वाजता त्यांच्या अपघाताचाच फोन आल्याचे जमदाडे यांनी सांगितले. कंपनीतील मित्र परिवारात हे तिघे सेवाभावी वृत्तीने काम करीत होते, असे त्यांनी सांगितले.तीन ठिकाणी अंत्यसंस्कार..रात्री नऊ वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाले. तीन शववाहिकेतून या तिघांचे मृतदेह त्यांच्या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. राऊत कुटूंबियांवर हडपसर येथे रात्री दोन वाजता अत्यसंस्कार करण्यात आले, तर शेळकंदे यांच्यावर जुन्नर तालुक्यातील भिवडी येथे सकाळी नउ वाजता आणि पाटणकर यांच्यावर दौंड जवळील नानवीज येथे मूळ गावात दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.राऊत यांच्या अत्यसंस्काराप्रसंगी कंपनीचे सहकारी, लातूरहून नातेवाईक मोठ्या संख्येने आले होते.