कोल्हापूर : मोरेवाडी (ता. करवीर) येथे कंजारभाट वसाहतीमधील गावठी दारूच्या आठ हातभट्ट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. ६) सकाळी उद्ध्वस्त केल्या. छापा टाकून केलेल्या कारवाईत तयार देशी दारूसह ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा केला.प्रकाश जॅक्सन बागडे, शक्ती क्रांती माटुंगे, चरण वीरसिंग बागडे, प्रमोद सुनील बागडे, मनोज मोहन मिणेकर, शेखर ठोकरसिंग मछले, अजित सरवर बाटुंगे आणि रोहित प्रकाश माटुंगे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी त्यांच्या घराजवळच गावठी दारूच्या हातभट्ट्या लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत ६०० लिटर कच्चे रसायन, ३९० लिटर पक्के रसायन आणि २६० लिटर तयार हाटभट्टीची दारू असा सुमारे ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी जाळून नष्ट केल. सहायक फौजदार शहनाज कनवाडे, अंमलदार अमर आडूळकर, अमित सर्जे, विनायक चौगुले, युवराज पाटील, संतोष पाटील, ओंकार परब, प्रवीण पाटील, आदींचा पथकात समावेश होता.