शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

गडहिंग्लज कारखान्याची निवडणूक मार्चमध्ये !

By admin | Published: December 11, 2015 12:38 AM

जानेवारीअखेर मतदार यादी : मतदारांच्या ठराव मागणीचा कार्यक्रम जाहीर

गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सहकारी संस्था मतदारांच्या ठराव मागणीचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या कारखान्याची निवडणूक मार्च २०१६ मध्ये होण्याची शक्यता आहे.८ जानेवारीपर्यंत सहकारी संस्था मतदारांचे ठराव, तर त्याच तारखेपर्यंतच्या व्यक्ती सभासदांची यादीही कारखान्याकडून मागविण्यात आली आहे. त्यानंतर कच्ची मतदार यादी प्रसिद्धी आणि त्यावरील हरकती व सुनावणी होईल.येत्या जानेवारीअखेर पक्की मतदारयादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजेच मार्चमध्ये कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबर २०१२ पर्यंतचे संस्था सभासद व १५ डिसेंबर २०१३ पर्यंतचे व्यक्ती सभासदच मतदारयादीत समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक गटातील २४,५०० व्यक्ती सभासद व १९८ संस्था मतदार या निवडणुकीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांपासून हा कारखाना पुण्याच्या ब्रीक्स् फॅसिलिटीज कंपनीला चालवायला दिला आहे. तेव्हापासून तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. गत निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. शिंदे व उपाध्यक्ष चव्हाण आणि हत्तरकी गट यांची सत्ताधारी आघाडी विरुद्ध तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर व आमदार हसन मुश्रीफ, कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर व संग्रामसिंह नलवडे गट यांच्या आघाडीत दुरंगी सामना झाला होता. त्यात शिंदे-चव्हाण यांनी बाजी मारली होती. आता दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळेच या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.