कोल्हापूरच्या ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक १३५, माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:44 AM2017-12-13T11:44:26+5:302017-12-13T11:48:56+5:30

शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार होते.

Elementary 135 in the 43rd science exhibition of Kolhapur, 130 of the secondary school's 130 equipment | कोल्हापूरच्या ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक १३५, माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश

कोल्हापूरच्या ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक १३५, माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर ४३ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनजिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ : वसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील

कोल्हापूर : चांगल्या गुणांसह मुलांनी आपल्यातील जिज्ञासावृत्ती जागृत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, हे असे का? कारण जिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ आहे. त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्यातील जिज्ञासावृत्ती जागृत करा, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले.

शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार होते.

डॉ. पाटील म्हणाले, आजच्या युगात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. संपत्तीपेक्षा विद्वत्तेला सलाम केला जातो. विज्ञानामुळे माणूस जवळ आला; पण माणूसपण दूर गेले आहे. त्यामुळे विज्ञानाला धर्माची जोड देणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंत:प्रेरणा जागृत करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या मनात सतत नवीन शिकण्याचा ध्यास असला पाहिजे. अंत:प्रेरणा जागी झाली तरच योग्य शोध लागतील.

यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा ‘शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील १३५, तर माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश आहे. तसेच शिक्षकांच्या १३ उपकरणांचा सहभाग आहे. सौरऊर्जेवर चालणारी गाडी, ध्वनिप्रदूषण रोखणारा जॅमर, सोलर हिटर अशा विविध प्रकाराची उपकरणे यामध्ये मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन गुरुवार (दि. १४)पर्यंत खुले राहणार आहे.


भक्ती फट्टे, रुपाली नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. व्ही. कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर एस. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपाली सावंत यांनी आभार मानले. यावेळी गुजराती मित्र मंडळाचे चेअरमन जसवंतभाई शहा, विज्ञान समितीचे अध्यक्ष एम. एस. शिंदे, विज्ञान समिती सचिव प्रकाश सुतार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

 

Web Title: Elementary 135 in the 43rd science exhibition of Kolhapur, 130 of the secondary school's 130 equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.