ते सात-बारा अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:34+5:302021-03-06T04:24:34+5:30

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : बुरंबाळी ...

At the end of seven-twelve, it was in the hands of Burambali villagers | ते सात-बारा अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती

ते सात-बारा अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती

Next

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : बुरंबाळी व नऊ नंबर ( ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्थांचा गेल्या सत्तेचाळीस वर्षांचा त्यांच्या राहत्या घराचा सात-बाराचा प्रश्न आज निकाली निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन या धरणग्रस्तांना एक दिवसात त्यांच्या जमिनीचे सात-बारा करण्याचे आदेश दिले.

यावरती ‘लोकमत’ने ‘बुरंबाळी धरणग्रस्त सात-बाराच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित केले हाेते. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून, आजच्या आज सात-बारा तयार करा, असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये थांबून हे सात-बाराचे काम पूर्ण केले.

तुळशी धरण बांधणीपासून हे शेतकरी विस्थापित ठिकाणावर वास्तव्यास आहेत. त्यांचा हा हक्काचा सात-बाराचा लढा गेली कित्येक वर्षे चौकशीच्या प्रक्रियेत अडकला होता. या फाईलवर गेल्या कित्येक दिवसांपासून त्रुटी निघत होत्या. दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चानक बुरंबाळी गावाला भेट दिली व या धरणग्रस्तांच्या मागण्या जाणून घेतल्या.

तेथूनच सात-बारा अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन एकाच दिवसात सात-बारा तयार करण्याची सूचना केली. पण दहा दिवस लोटले तरी सात-बारा तयार न झाल्याने ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त सूचना देत सायंकाळपर्यंत सात-बारा अद्ययावत करण्याच्या सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबूनच हे सात-बारा पूर्ण केले.

रात्री उशिरा ही बातमी बोंबाळे ग्रामस्थांना समजताच त्यांनी आपला इतक्या वर्षांचा प्रश्न निकाली निघाला, या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

Web Title: At the end of seven-twelve, it was in the hands of Burambali villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.