गडहिंग्लज : येथील तरुण उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी, मुलासह आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी संतोषच्या आई सुमित्रा, बहीण प्रतिभा यांनी केलेल्या आक्रोशाने आमदार मुश्रीफही नि:शब्द झाले.आमदार मुश्रीफ हे संतोष यांच्या घरी आल्याचे समजताच शहरातील विविध संघटनांच्या प्रमुखांनीही धाव घेतली. पोलिस निरीक्षक गजानन सरगरही पोहोचले. बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून संतोषकडून खंडणी वसूल करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सर्वांनी केली. त्यानुसार मुश्रीफ यांनी पोलिस निरीक्षकांना सूचना दिल्या. याप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घडविण्याची मागणी उपस्थितांनी केली. त्यानुसार मुश्रीफ यांनी पालकमंत्री केसरकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी भेटीसाठी सोमवार (दि. २६) सकाळी साडेदहाची वेळ दिली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, महेश कोरी, नितीन देसाई, काँग्रेसचे बसवराज आजरी, भाजपचे चंद्रकांत सावंत, जि.प. माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, संजय रोटे, दीपक कुराडे, प्रकाश पताडे, गुंड्या पाटील, महेश सलवादे, राजू जमादार, राहुल शिरकोळे उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर यांची भेट घेणार आज, सोमवारी सकाळी आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री केसरकर यांची भेट घेणार आहे.मुश्रीफांच्या डोळ्यातही अश्रू!‘माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. आमचं कुटुंब कष्टातून उभं राहिलंय साहेब, माझ्या चिमुकल्या नातवानं काय गुन्हा केला होता हो, असं विचारत
उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: माझ्या नातवानं काय गुन्हा केला?, कुटुंबियांचा आक्रोश; हसन मुश्रीफही झाले निशब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 3:42 PM