कोल्हापूर: हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत शुक्रवारी दुपारनंतर वादळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह एन्ट्री केली.साडेचारच्या सुमारास बरसलेल्या जलधारांमुळे दिवसभराचा उष्मा गारव्यात परावर्तीत झाला. घामांच्या धारामुळे कासावीस झालेल्या जीवाला पावसाच्या थेंबानी सुखाची अनुभूती दिली.केरळ व विदर्भाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील दक्षिणेतील सर्वच राज्यात सोमवारपर्यंत जोरदार वादळी पाऊस पडेल, आभाळ ढगाळ राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते दुपारीच पाऊस येईल असे वाटत होते, पण तो शहरात साडेचारच्या सुमारास दाखल झाला. सुरुवातीला थांबून थांबून येणाऱ्या पावसाने नंतर जोर धरला. वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस कोसळला.गुरुवारीही दुपारनंतर असेच पावसाचे वातावरण होते, पण एखाद दुसरे थेंब सोडता जोरदार पावसाने हुलकावणी दिली. शुक्रवारी मात्र पावसाने ही सगळी कसर भरुन काढत ढगांच्या गडगडाटासह आगमन केले.
सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 5:34 PM
Rain Kolhapur : हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत शुक्रवारी दुपारनंतर वादळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह एन्ट्री केली.साडेचारच्या सुमारास बरसलेल्या जलधारांमुळे दिवसभराचा उष्मा गारव्यात परावर्तीत झाला. घामांच्या धारामुळे कासावीस झालेल्या जीवाला पावसाच्या थेंबानी सुखाची अनुभूती दिली.
ठळक मुद्देसोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची एन्ट्री दुपारनंतर पावसाच्या धारा